MP Breaking News
Mon, Dec 15, 2025

Municipal Corporations Election Date : महापालिकेसाठी या तारखेला मतदान होणार; निवडणूक आयोगाची मोठी घोषणा

२९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान पार पडणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १६ जानेवारी २०२६ ला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल
Municipal Corporations Election Date : महापालिकेसाठी या तारखेला मतदान होणार; निवडणूक आयोगाची मोठी घोषणा

Municipal Corporations Election Date : मुंबई-ठाण्यासह राज्यातील प्रलंबित 29 महापालिका निवडणुकांचे बिगुल आज वाजलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत याबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान पार पडणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १६ जानेवारी २०२६ ला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. राज्यातील 29 महापालिकांसाठी 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहेत.आजपासून या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

काय म्हणाले आयुक्त ?

राजकीय पक्षांनी केलेल्या मागणीनुसार नामनिर्देशन पत्र हे ऑफलाईनच घेण्यात येणार आहे. जात वैधता पडताळणीसाठी राखीव जागेवर लढणाऱ्यांना जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार. सत्यप्रत वा अन्य पुरावा द्यावा. त्यानंतर सहा महिन्याच्या आत वैधता प्रमाणपत्र देण्याचं हमी पत्र द्यावी लागेल. नाही दिलं तर निवड रद्द होईल. या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ ची मतदार यादी वापरली जाईल.

काही महापालिका क्षेत्रात संभाव्य दुबार मतदारांची संख्या जास्त आहे. अशा मतदारांसमोर डबल स्टार असणार आहे. मतदान केंद्रावर जेष्ठ नागरिक, दिव्यांग, लहान बाळ असलेल्या महिलांसाठी खास सुविधा उपलब्ध असतील. वीज, सावली, सौचालयाची सुविधा उपलब्ध असेल. मतदानाच्या आधी ४८ तास प्रचारावर बंदी असेल.निवडणूक अधिकारी म्हणून २९० निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर ८७० सहायक निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. आजपासून सर्व महापालिका क्षेत्रात आचारसंहिता सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती आयुक्तांनी दिली

महत्वाच्या तारखा –

अर्ज स्वीकारणे – २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५
अर्जाची छाननी – ३१ डिसेंबर २०२५
उमेदवार माघारीची मुदत – २ जानेवारी २०२६
चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवाराची यादी – ३ जानेवारी २०२६
मतदानाची तारीख – १५ जानेवारी २०२६
मतमोजणी तारीख – १६ जानेवारी २०२६