Raj Thackeray Slam Eknath Shinde : मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी; राज ठाकरेंचा शिंदेंवर पहिला वार

राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत आज मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरेंनी भाजप आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रथमच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल (Raj Thackeray Slam Eknath Shinde) केला आहे. मला मुख्यमंत्री करा म्हणून तुम्ही किती लाचारी करणार आहात असा सवाल करत राज ठाकरेंनी आपली तोफ शिंदेंवर धाडली आहे. राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत आज मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरेंनी भाजप आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

शिंदेंवर टीका कोणत्या कारणाने? Raj Thackeray Slam Eknath Shinde

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नमो टुरिझम सेंटर काढण्यात येणार आहे. परंतु हे सेंटर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर काढण्यात येणार आहेत. यावरूनच राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लक्ष केलं. राज ठाकरे म्हणाले, आजच्या वृत्तपत्रात आलेली बातमी पाहा, किती स्वाभीमान गहाण टाकायचा ह्याला काही मर्यादाच नाहीत. हे एकनाथ शिंदेचं खातं. ह्याचा जीआर देखील काढलाय. नरेंद्र मोदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकार काही टुरिझम पाँईट काढत आहेत. त्यासाठी, रायगड, शिवनेरी, राजगडावर पर्यटनाची नमो टुरिझम सेंटर काढत आहे. आमच्या महाराजांच्या किल्ल्यांवर, जिथं फक्त महाराजांचंच नाव हवं तिथं, हे उभं केलं जातंय. मी आत्ताच सांगतो उभं केलं की फोडून टाकणार. मला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?? (Raj Thackeray Slam Eknath Shinde) किती चाटूगिरी कराल? असं म्हणत राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीकेची झोड उठवली.

EVM मत चोरीचे प्रात्यक्षित

दरम्यान, ईव्हीएम मशिनच्या सहाय्याने आपलं मत कसं चोरीला जाते, आपण ज्याला मतदान केलं आहे, त्याला ते न जाता, दुसऱ्याच व्यक्तीला कसं जाऊ शकतं याचं प्रात्यक्षिक आज मनसेच्या वतीनं सादर करण्यात आलं. गेली अनेक वर्ष मी हे सांगतोय. केळाला मत दिलं पण गेलं कलिंगडला, असे म्हणत राज ठाकरेंनी भाजपावर घणाघात केला. एक तारखेचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, महाराष्ट्रात काय आग पेटलीय हे दिल्लीला कळलं पाहिजे. सर्वांनी मोर्चाला या, बॉसने सुट्टी दिली नाही तर बॉसला मारा. शनिवारपुरतं एक मत त्याच्या गालावर द्या असेही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News