शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उल्लेख ऍनाकोंडा असा केला आहे. आज आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाचा निर्धार मेळावा पार पडला. यावेळी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी भाजपवर आपल्या नेहमीच्या ठाकरे शैलीत फटकारे मारले. भाजप म्हणजे नामर्दाची आवलाद आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले…
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मुंबईवर दोन व्यापाऱ्यांच डोळा आहे, आजच एकच येऊन गेला. सामनात दोन बातम्या पाहिल्या, भाजप कार्यालयाच भूमिपूजन आणि दुसरी बातमी राणीच्या बागेत अँनाकोंडा आणला जाणार, आज तसाच एक येऊन गेला. मी अमित शाहांना आव्हान देतो. तुम्ही मुंबईत येऊन गेले. निवडणुकीनंतर मुंबई भगवी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करायचे ते करा, कितीही डोकं आपटा. डोकी फुटतील पण भगवा फुटणार नाही.

भाजप म्हणजे नामर्दाची आवलाद
दरम्यान,भाजप ही बोगस टोळी आहे. हा जगातील सर्वात मोठा पक्ष कसला ? ही तर नामर्दाची आवलाद आहे. भाजपला आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे, पण त्यांना आत्मनिर्भर भाजप बनवता येत नाही, भाजपला भाडयाने घ्यावे लागत आहेत. अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं. एक चहावाला पंतप्रधान झाला, आम्ही पाठींबा दिला म्हणून पंतप्रधान झाला . आता निवडणूक आल्यामुळे भाजप वाले ते हिंदू मुस्लीम करतील. आपण मारामाऱ्या करतो. भांडण करतो. त्यावेळी हे मतचोरी करतात. हे हिंदू मुसलमान करतात तेव्हा समजायचं निवडणूक आली, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली.











