मुंबई – क्रिकेटर शुभमन गिलला टीम इंडियाच्या टेस्ट टीमचं कर्णधारपद देण्यात आलंय. शनिवारी मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. यासोबतच इंग्लंड दौऱ्यासाठी १८ जणांच्या टीमची घोषणाही यावेळी करण्यात आली. २० जूनपासून इंग्लंडचा दौरा सुरु होणार असून, या काळात ५ टेस्ट खेळण्यात येणार आहेत.
ऋषभ पंतकडे व्हाईस कॅप्टन्सी देण्यात आलीय. तर विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर साई सुदर्शन आणि करुण नायर यांना टीममध्ये संधी देण्यात आलीय. शार्दुल ठाकूरचंही टीममध्ये कमबॅक झालंय.

टीममध्ये कुणाकुणाला संधी
१. शुभमन गिल
२. ऋषभ पंत
३. यशस्वी जैस्वाल
४. अभिमन्यू इश्वरन
५. केएल राहुल
६. करुण नायर
७. साई सुदर्शन
८. ध्रुव जुरेल
९. नितीश रेड्डी
१०. शार्दुल ठाकूर
११. रवींद्र जडेजा
१२. वॉशिंग्टन सुंदर
१३. जसप्रीत बुमराह
१४. मोहम्मद सिराज
१५. प्रसिद्ध कृष्णा
१६. आकाश दीप
१७. अर्शदीप सिंह
१८. कुलदीप यादव
गिल टेस्टचा पाचवा तरुण कप्तान
टेस्ट टीमची कॅप्टन्सी मिळालेला शुभमन हा पाचवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी मन्सूर अली खान पटौदी, वय २१, सचिन तेंडुलकर, वय २३, कपिल देव, वय २४ आणि रवी शास्त्री वय २५, या चौघांना कमी वेळात अशी संधी मिळाली होती.
शुभमन गिलने कर्णधार होताच मोठा विक्रम रचला आहे. सचिन तेंडुलकर, कपिल देव, रवी शास्त्री सारख्या दिग्गजांच्या यादीत त्याने स्थान पटकावलं आहे.
कसोटी सामन्यातील भारताचे सर्वात तरुण कर्णधार
मन्सूर अली खान पतौडी २१ वर्षे – ७७ दिवस विरुद्ध वेस्ट इंडिज, ब्रिजटाऊन – २३ मार्च १९६२
सचिन तेंडुलकर २३ वर्षे – १६९ दिवस विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दिल्ली – १० ऑक्टोबर १९९६
कपिल देव २४ वर्षे – ४८ दिवस विरुद्ध वेस्ट इंडिज, किंग्स्टन – २३ फेब्रुवारी १९८३
रवी शास्त्री २५ वर्षे – २२९ दिवस विरुद्ध वेस्ट इंडिज, चेन्नई – ११ जानेवारी १९८८
शुभमन गिल २५ वर्षे – २८५ दिवस विरुद्ध इंग्लंड, लीड्स – २० जून २०२५











