भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका १४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. पहिला कसोटी सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे खेळला जाईल. २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताची ही दुसरी घरची मालिका असेल. पहिल्या घरच्या मालिकेत टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा २-० असा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका विजय मिळवल्यास भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत फायदा होऊ शकतो. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी, WTC क्रमवारीचा आढावा घेऊया.
WTC पॉइंट्स टेबल स्थिती
ऑस्ट्रेलिया सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे, त्याने आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत आणि अशा प्रकारे त्यांचे गुण टक्केवारी १०० आहे. श्रीलंका दुसऱ्या स्थानावर आहे, त्याने आतापर्यंत दोन सामन्यांपैकी एक जिंकला आहे आणि एक अनिर्णित ठेवला आहे. त्यांची गुण टक्केवारी ६६.६७ आहे.

भारतीय संघाने आतापर्यंत सात सामने खेळले आहेत, ज्यामध्ये चार विजय, दोन पराभव आणि एक अनिर्णित आहे. भारतीय संघाची गुण टक्केवारी सध्या ६१.९० आहे. गतविजेता दक्षिण आफ्रिका सध्या ५० गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
पहिले स्थान – ऑस्ट्रेलिया
दुसरे स्थान – श्रीलंका
तिसरे स्थान – भारत
चौथे स्थान – दक्षिण आफ्रिका
पाचवे स्थान – पाकिस्तान
भारतीय संघाने आतापर्यंत २०२१ आणि २०२३ च्या WTC फायनल खेळल्या आहेत, परंतु न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत आणि नंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये पराभव पत्करल्यानंतर, भारत २०२५ चा अंतिम सामना खेळू शकला नाही.
भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025-27 वेळापत्रक:
इंग्लंड दौरा – मालिका 2-2 ने अनिर्णीत (ड्रॉ)
वेस्ट इंडीजविरुद्ध घरच्या मैदानावर मालिका – भारताने 2-0 ने विजय मिळवला
दक्षिण आफ्रिका दौरा – 2 कसोटी सामन्यांची मालिका (लवकरच होणार)
श्रीलंका दौरा (ऑगस्ट 2026) – 2 कसोटी सामन्यांची मालिका
न्यूझीलंड दौरा (ऑक्टोबर 2026) – 2 कसोटी सामन्यांची मालिका
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका (घरच्या मैदानावर) – 5 कसोटी सामने (WTC चक्रातील शेवटची मालिका)
या चक्रात भारत एकूण 13 कसोटी सामने खेळणार आहे.











