Video : ना हातोडी, ना कटर; आवाज न करता अवघ्या १० सेकंदात उघडलं टाळं; चोराची आयडिया पाहून पोलिसही हैराण!

टाळं उघडण्यासाठी चोराकडे हातोडी नव्हती ना कटर होतं. केवळ एक सिरींज आणि लायटर...

lock opened in just seconds : टाळं लावणं हे काही घराच्या सुरक्षिततेची गॅरेंटी देऊ शकत नाही हे सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधून स्पष्ट होत आहे. वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक चिंतेत आहेत. मात्र दारावर केवळ टाळं लावल्याने तुमचं घर सुरक्षित असू शकत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चोर टाळं उघडण्याची आयडिया पोलिसांना सांगताना दिसत आहे.

टाळं उघडण्यासाठी चोराकडे हातोडी नव्हती ना कटर होतं. केवळ एका सिरिंजमध्ये पेट्रोल आणि लायटरमधून अवघ्या १० सेकंदात चोराने टाळं उघडलं. धक्कादायक बाब म्हणजे टाळं उघडण्यासाठी चोराने कोणताही आवाज केला नाही. हा व्हिडिओ पाहून पोलिसही हैराण झाले.

कसं उघडलं टाळं?

या व्हिडिओमध्ये चोर एक सिरींज आणि एक लायटरचा वापर करतो. सिरींज ही पेट्रोलने भरलेली आहे. चोर आधी सिरींजमधून पेट्रोल टाळ्याच्या पृष्ठभागावरील छिद्रात टाकतो. काही वेळ वाट पाहतो आणि टायटरने टाळ्याला आग लावतो. आग लावल्यामुळे टाळ्यातील प्लास्टिक वितळतं. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात तो टाळ्याला झटका देत उघडतो.

टाळ्यात प्लास्टिकची लॉक सिस्टीम

चोराने पोलिसांना सांगितलं की, सध्या येणाऱ्या टाळ्यांमध्ये लॉक करणारा भाग हा प्लास्टिकचा असतो. आग लावल्यामुळे प्लास्टिक वितळलं. परिणामी टाळं सहज उघडलं जातं. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावरील युजर्स हैराण झाले आहेत. घराच्या सुरक्षेसाठी तयार केलेले टाळे इतक्या सहजपणे कसे तोडले जाऊ शकतात असा सवाल युजर्सकडून उपस्थित केला जात आहे. 

दरम्यान या व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने लिहिलंय, कोण म्हणजं भारतात प्रतीभा नाही, जर चीन २०२५ मध्ये जगत असेल तर आमच्याकडील चोर ३०३० मध्ये आहे. तर काही युजरने हे फेक असल्याचं म्हटलं आहे.


About Author

Smita Gangurde

Other Latest News