Puja Tips : पूजा करणे हा देवाशी जोडण्याचा आणि त्याच्या जवळ जाण्याचा एक उत्तम मार्ग आहे. घरात पूजा केल्याने वातावरण सकारात्मक बनते. तसेच धार्मिक कार्यामुळे प्रगतीचे मार्ग खुले होतात. देव-देवतांच्या आशीर्वादाने, एखाद्याचे प्रयत्न यशस्वी होतात. तसेच संपत्ती, समृद्धी आणि आनंद मिळतो. परंतु पूजा करताना आणि पूजा केल्यानंतर सुद्धा काही गोष्टी टाळणे गरजेचे आहे. अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकते. यातीलच महत्वाची बाब म्हणजे राख.. राखेकडे आपण नेहमी तुच्छतेने बघतो. त्यामुळे अनेकदा पूजानंतर शिल्लक राहिलेल्या राखेसह चुका करतात, ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होते.
देवासमोर राख पडून ठेवू नका- Puja Tips
पूजा करणे हे एक पवित्र कार्य आहे आणि उर्वरित साहित्याची योग्य आणि पवित्र पद्धतीने विल्हेवाट लावणे देखील तितकेच महत्वाचे आहे. अन्यथा, पूजा निष्फळ होते आणि देव नाराज होऊ शकता. दिवे, अगरबत्ती, धूप किंवा हवन साहित्याची राख कधीही निरुपयोगी आहे असे समजून फेकून देऊ नका. अन्यथा, दुर्दैव तुमचा पाठलाग करेल. यामुळे घराची सकारात्मक ऊर्जा कमी होईल आणि अनेक कामे रखडू शकतील. मंदिरात किंवा देवासमोर राख पडून ठेवू नका. यामुळे घरात नकारात्मकता वाढते. पूजा झाल्यानंतर (Puja Tips) लगेचच राख काढून टाका आणि देवासमोर नेहमीच स्वच्छता ठेवा.

पूजेच्या राखेचे काय करावे?
– पूजा राखेची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. राख एकाच ठिकाणी गोळा करा आणि नंतर, एक आठवडा किंवा महिन्यानंतर ती वाहत्या पाण्यात बुडवा.
– अनेक मंदिरांमध्ये पूजानंतरच्या साहित्यासाठी, जसे की वाळलेली फुले आणि राख, भांडे असतात. त्यात राख ठेवा. मंदिराचे कर्मचारी त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावतील.
राख स्वच्छ कापडात बांधा आणि घराबाहेर शांत आणि पवित्र ठिकाणी पुरून टाका. ही पद्धत शास्त्रानुसार देखील मानली जाते.
पर्यायीरित्या, राख तुमच्या बागेत किंवा कुंडीत मातीत मिसळा. परंतु ती अशा ठिकाणी ठेवू नका जिथे कोणी त्यांच्यावर पाऊल ठेवू शकेल.











