पुणे पुस्तक महोत्सवाचे १३ ते २१ डिसेंबर दरम्यान आयोजन; उपक्रमात सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे पुस्तक महोत्सवाचा एक भाग म्हणून दरवर्षी ‘शांतता पुणेकर वाचत आहेत' उपक्रमाचे 9 डिसेंबर 2025, मंगळवार, सकाळी 11 ते 12 या वेळेत आयोजन केले जाणार आहे, यामाध्यमातून समाजातल्या सर्व घटकांनी आप-आपल्या ठिकाणी आपल्या आवडीचे पुस्तक वाचावे यातून हे अभिप्रेत आहे.

राष्ट्रीय पुस्तक ट्रस्ट, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुणे पुस्तक महोत्सव ‘2025’ 13 ते 21 डिसेंबर 2025 दरम्यान फर्ग्युसन कॉलेज येथे आयोजन करण्यात येणार आहे. पुणे पुस्तक महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून गेल्या तीन वर्षापासून समाजामध्ये वाचन संस्कृती रुजविण्यात पुणे पुस्तक महोत्सवाचे मोठे योगदान आहे. ‘शांतता पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमात सहभागी व्ह’, असं आवाहनही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केलं आहे.

उपक्रमात सहभागी व्हा -जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

राष्ट्रीय पुस्तक ट्रस्ट, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुणे पुस्तक महोत्सव २०२५’ १३ ते २१ डिसेंबर २०२५ दरम्यान फर्गुसन कॉलेज येथे आयोजन करण्यात येणार आहे. पुणे पुस्तक महोत्सवाचे तिसरे वर्ष असून गेल्या तीन वर्षापासून समाजामध्ये वाचन संस्कृती रुजविण्याकरता पुणे पुस्तक महोत्सवाचे मोठे योगदान आहे. पुणे पुस्तक महोत्सवाचा एक भाग म्हणून दरवर्षी ‘शांतता पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमाचे 9 डिसेंबर २०२५, मंगळवार, सकाळी ११ ते १२ या वेळेत आयोजन केले जाणार आहे, यामाध्यमातून समाजातल्या सर्व घटकांनी आप-आपल्या ठिकाणी आपल्या आवडीचे पुस्तक वाचावे यातून हे अभिप्रेत आहे.

वाचन संस्कृती जोपासण्यासाठी उपक्रम आवश्यक

पुणे शहरातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी सुद्धा पुस्तक वाचावे व त्यानंतर आपला फोटो काढून क्युआर कोडवर फोटो अपलोड करून
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.  वाचन संस्कृती जोपासण्यासाठी घेतलेले प्रयत्न ही समाजाची बौद्धिक वाढ साधणारी अत्यंत महत्त्वाची पावले आहेत. आजच्या डिजिटल युगात पुस्तकांपासून दूर जाण्याची प्रवृत्ती वाढत असली तरी वाचनाचे महत्त्व अबाधित आहे.

ग्रंथालयांचे आधुनिकीकरण, वाचनालय उपक्रम, पुस्तक महोत्सव, वाचन स्पर्धा आणि शाळांमधील वाचन प्रोत्साहन कार्यक्रम यांमुळे नव्या पिढीत ज्ञानाची आवड जागृत होते. वाचन संस्कृतीमुळे विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि शब्दसंपदा वाढते. समाजात संवाद कौशल्य, समजूतदारपणा आणि जागरूकता निर्माण होते. म्हणूनच वाचन संस्कृती जोपासणे हे सर्वांसाठी प्राधान्याचे कार्य ठरते.


About Author

Rohit Shinde

Other Latest News