चंपाषष्ठीला खंडोबाची कृपा मिळवण्यासाठी कणकेचे रोडगे हा एक महत्त्वाचा नैवेद्य आहे, जो खास बनवला जातो. चंपाषष्ठी हा खंडोबाचा उत्सव असून या दिवशी अनेक प्रकारचे नैवेद्य खंडोबाला अर्पण केले जातात, ज्यात कणकेचे रोडगे हे मुख्य मानले जाते. या पदार्थाचे विशेष महत्त्व आहे.
साहित्य
- ३ वाट्या गव्हाचे पीठ
- १/२ वाटी रवा
- ४-५ चमचे तूप
- चवीनुसार मीठ
कृती
- एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ, रवा, आणि मीठ एकत्र करा.
- त्यामध्ये तूप घालून चांगले मिसळा.
- पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्या. हे पीठ कणकेप्रमाणे मऊ नसावे.
- मळलेल्या पिठाचे छोटे-छोटे गोळे करा.
- आप्पेपात्रात तेल टाकून गरम करून घ्यावे.
- आता हे गोळे आप्पेपात्रात ठेवून 5 मिनिटं मंद आचेवर राहू द्यावे.
- तांबूस रंग आल्यावर त्याला पलटून घ्यावे.
- कुरकुरीत होईपर्यंत त्याला परतत राहावे.
- नैवेद्यासाठी तूप, वरण-भात आणि वांग्याच्या भाजी सोबत रोडगे वाढा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)












