बाथरूममधील ‘या’ चुकांमुळे वास्तुदोष होतात, जाणून घ्या उपाय…

Asavari Khedekar Burumbadkar

वास्तुशास्त्र हे जीवनात खूप महत्वाचे आहे. जर घराची वास्तु योग्य नसेल तर जीवनात समस्या येतात आणि कठोर परिश्रम करूनही इच्छित यश मिळत नाही. बाथरूम देखील घराचा एक भाग आहे. त्यामुळे बाथरूमच्या वास्तुची विशेष काळजी घ्यावी लागते. जर बाथरूमच्या वास्तुमध्ये दोष असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात त्याच्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. म्हणून वास्तुदोषाची काळजी घेणे आणि त्याचे निराकरण करणे खूप महत्वाचे आहे. बाथरूममध्ये काही चुका केल्यास वास्तुदोष येऊ शकतो. वास्तुशास्त्रानुसार, बाथरूममध्ये नकारात्मक ऊर्जा असल्यास, ते आरोग्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी हानिकारक ठरू शकते. बाथरुमशी संबंधित कोणते वास्तु नियम पाळले पाहिजेत ते जाणून घेऊया…

बाथरूमचा दरवाजा

बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा. जर दरवाजा उघडा असेल, तर नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करू शकते. बाथरूमचे दरवाजे कधीही लोखंडाचे नसावेत, तसेच दरवाजा तुटलेला नसावा. ज्योतिषशास्त्रानुसार, बाथरूममध्ये लाकडी दरवाजा बसवणे सर्वात शुभ मानले जाते आणि बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवण्याचा प्रयत्न करा. बाथरूमचा दरवाजा उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला असावा. 

बाथरूमची दिशा

वास्तुशास्त्रानुसार, बाथरूम उत्तर-पश्चिम किंवा पश्चिम दिशेला असणे चांगले मानले जाते. जर बाथरूम दक्षिण किंवा पूर्व दिशेला असेल, तर ते नकारात्मक ऊर्जा वाढवू शकते.

बाथरूमची साफसफाई

बाथरूम नेहमी स्वच्छ आणि सुव्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे. घाणीमुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. 

बाथरूममधील वास्तुदोष दूर करण्याचे उपाय

  • वास्तुशास्त्रानुसार, बाथरूममध्ये सेंधव मीठ ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता वाढते.
  • काचेच्या भांड्यात मीठ भरून बाथरूममध्ये ठेवल्यास वास्तुदोष दूर होतात.
  • आठवड्यातून एकदा मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने वाईट नजरेपासून संरक्षण मिळते आणि आरोग्याशी संबंधित समस्या कमी होतात.
  • वास्तुशास्त्रानुसार, तुरटीचे छोटे तुकडे खिडकी किंवा दरवाजाजवळ ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात.
  • बाथरूममध्ये पुरेसा प्रकाश आणि हवा खेळती ठेवल्यास नकारात्मकता कमी होते. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्या