मुंबई उच्च न्यायालयात 2,331 जागांसाठी भरती; पगार 1.77 लाख, अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या !

मुंबई उच्च न्यायालयाने लिपिक, शिपाई, स्टेनोग्राफर, चालक यासह विविध पदांसाठी 2331 जागांची मेगा भरती जाहीर केली. ही भरती मुंबई, नागपूर, औरंगाबाद खंडपीठांसाठी असेल. शिवाय यासाठीची अर्जप्रक्रीया ऑनलाईन पद्धतीने पार पाडली जाणार आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूण- तरूणींसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने लिपिक, शिपाई, स्टेनोग्राफर, चालक यासह विविध पदांसाठी 2331 जागांची मेगा भरती जाहीर केली. ही भरती मुंबई, नागपूर, औरंगाबाद खंडपीठांसाठी असून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 15 डिसेंबर 2025 पासून सुरू आहे.  सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! मुंबई उच्च न्यायालयाने मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे. मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या तीनही खंडपीठांसाठी लिपिक, शिपाई, स्टेनोग्राफर, चालक आणि अन्य पदांसाठी एकूण 2331 जागांची भरती होणार आहे. उच्च न्यायालयाकडून अधिकृत अधिसूचनेलाही मान्यता देण्यात आली असून अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

भरती प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती

एकूण पदे : 2331

खंडपीठे : मुंबई, नागपूर, औरंगाबाद

अर्ज पद्धत : Online

अधिकृत वेबसाइट : bombayhighcourt.nic.in

अर्ज सुरू : 15 डिसेंबर 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 जानेवारी 2026

अर्ज शुल्क : सर्व वर्गांसाठी ₹1000

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा + मुलाखत

उच्च न्यायालय भरती 2025 -शैक्षणिक पात्रता 

Steno (HG): पदवीधर + शॉर्ट हैण्ड 100 श.प्र.मि. + इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि

Steno (LG): पदवीधर + शॉर्ट हैण्ड 80 श.प्र.मि. + इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि

Clerk: पदवीधर + इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. (GCC-TBC / ITI) + MS-CIT किंवा समतुल्य

Driver: 10 वी उत्तीर्ण + हलके मोटार वाहन चालक परवाना + 03 वर्षे अनुभव

Peon: किमान 07 वी उत्तीर्ण


About Author

Rohit Shinde

Other Latest News