Modi’s Successor : मोदींनंतर पुढचा पंतप्रधान कोण? मोहन भागवत म्हणाले की…

Modi’s Successor : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे नंबर वनचे नेते… आज संपूर्ण देशात मोदींच्याच नावाचा गजर ऐकायला मिळतो. मोदी मोदी आणि फक्त मोदीच मोदी हे तो मुनकीन है असं भाजपचे कार्यकर्ते अभिमानाने सांगत असतात. मोदींच्या नावावरच आज संपूर्ण देशात भाजपकडून मते मागितली जातात. मोदीच नसतील तर भाजप अस्तित्वहीन होईल अशी आजची संपूर्ण देशातील परिस्थिती आहे. परंतु सध्या नरेंद्र मोदींचे वय 75 वर्षे  आहे. 2029 च्या लोकसभा निवडणुकीनंतर जर भाजप सत्तेत आली तर मोदी पंतप्रधान राहतील की दुसऱ्या एका चेहऱ्याला पंतप्रधान करावे लागेल याबाबत अजूनही चर्चा सुरू असतात. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांना विचारलं असता त्यांनी हुशारीने उत्तर दिले.

काय म्हणाले मोहन भागवत (Modi’s Successor)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शताब्दीनिमित्त चेन्नई येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मोहन भागवत यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांना मोदींच्या उत्तराधिकारी बाबत प्रश्न केला असता मोहन भागवत म्हणाले, कि याबाबत भाजप आणि मोदी आपापसात चर्चा करून निर्णय घेतील. भागवत यांनी हुशारी दाखवत कोणत्याही एका नेत्याचे नवा टाळलं. परंतु नेहमीच अशी चर्चा सुरु असते कि नरेंद्र मोदी यांच्यानंतर योगु आदित्यनाथ, नितीन गडकरी किंवा देवेंद्र फडणवीस त्यांची जागा घेऊ शकतात.  Modi’s Successor

तामिळनाडूमध्ये १००% राष्ट्रवादी भावना

दरम्यान, याप्रसंगी मोहन भागवत यांनी तामिळनाडूमध्ये आरएसएसच्या मर्यादेवरही भाष्य केले. त्यांनी सांगितले की तामिळनाडूमध्ये १००% राष्ट्रवादी भावना आहे, परंतु काही कृत्रिम अडथळे या भावनेच्या पूर्ण अभिव्यक्तीमध्ये अडथळा आणत आहेत. हे कृत्रिम अडथळे फार काळ टिकणार नाहीत आणि आपण ते दूर करण्यासाठी काम केले पाहिजे. तामिळनाडूचे लोक संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रीय हितासाठी समर्पित आहेत आणि ही मूल्ये आणखी मजबूत करण्याची आवश्यकता आहे असेही मोहन भागवत यांनी म्हंटल. मोहन भागवत यांनी दक्षिण भारतीय राज्यांच्या संस्कृतीचे, विशेषतः त्यांच्या पारंपारिक पोशाखाचे, “वेष्टी” चे कौतुक केले, जे लोकांच्या सांस्कृतिक संबंधांचे प्रतिबिंब आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News