Hartalika Tritiya 2025 : हरितालिका तृतीयेला सौभाग्यवती महिला व्रताचं संकल्प करतात आणि पूजाअर्चा करतात. या व्रताला दान करण्याची पद्धत आहे. हरितालिकेला काही विशेष वस्तूंचं दान केल्याने माता पार्वती प्रसन्न होते आणि अखंड सौभाग्यवती आणि सुखी जीवनाचा आशीर्वाद देते. या दिवशी विवाहित महिलांनी शुभ वस्तूंचं दान केलं तर आयुष्यातील अडथळे दूर होतात. कोणत्या गोष्टींचं दान करायला हवं, जाणून घेऊया.
हरितालिकेच्या दिवशी या वस्तूंचं करा दान
श्रृंगाराच्या वस्तू
हरितालिकेच्या दिवशी गरजू महिलांना श्रृंगाराच्या वस्तूंचं दान केल्याने माता पार्वत प्रसन्न होते. हरितालिकेला लाल ओढणी, टिकली, बांगड्या, पैंजन, फणी, मेंदी, आल्ता, काचेच्या बांगड्या आदी गोष्टी दान करू शकता. हिरव्या रंगाचे कपडे, म्हणजे हिरवी साडी किंवा हिरवी ओढणी दान केल्याने पुण्याची प्राप्ती होते.
सुपारी
हरितालिकेला पान आणि सुपारी सारख्या वस्तू दान केल्यानं वैवाहिक जीवनातील बांधांचा अंत होतो. जीवनात शांती संचारते.
जेवणाच्या साहित्याचं दान
हरितालिकेला गहू, तांदूळ, डाळ, मिठाई आदी खाण्याच्या पदार्थांचं दान केल्यान भगवान प्रसन्न होऊन सुखाचा आशीर्वाद देतात. या दिवशी फळाचं दान करू शकता.
पूजेच्या साहित्याचं करावं दान
हरितालिकेच्या दिवशी पूजा-अर्चा केली जाते. अशावेळी धूप, दिवा, कापूर, नारळसह माती किंवा तांब्याचा कलश दान केल्याने पूजेचा दुप्पट फायदा होतो.
गाईचं दान
गाईचं दान शुभ दान मानलं जातं. जर तुम्ही गाईचं दान करू शकता इतकी शक्ती तुमच्यात असेल तर हरितालिकेला अवश्य गाईचं दान कराल. जर इतकी क्षमता नसेल तर गाईला चारा खाऊ घाला आणि गोशाळेत काही रक्कम दान करावी.
टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.





