नवी मुंबईत घर घेणे हे अनेकांचे स्वप्न आहे. स्वच्छ, नियोजनबद्ध आणि आधुनिक सुविधा असलेल्या या शहरात आपले स्वतःचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. या स्वप्नपूर्तीत सिडकोची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सिडकोने नवी मुंबईचे नियोजन करून परवडणारी घरे, प्लॉट्स आणि टाउनशिप विकसित केल्या आहेत. सामान्य नागरिकांना परवडतील अशा योजनांद्वारे घर उपलब्ध करून देणे हा त्यांचा उद्देश आहे. अशा परिस्थितीत आता पुन्हा एकदा एक भन्नाट योजना सर्वसामान्यांसाठी आणली आहे.
17 हजार घरांच्या किंमती कमी होणार !
सिडकोंच्या घरांसाठी असलेल्या किमती आता 10 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सिडकोच्या EWS आणि LIG या घटकांसाठी असलेल्या घरांच्या किमती त्यामुळे कमी होणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे 17 हजार घरांच्या किमती कमी होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. सिडकोसाठी आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या आणि एलआयजी घरांसाठी असलेल्या किमती करण्यासंदर्भात अनेक मागण्या होत्या. त्यावर अनेक बैठका झाल्या. विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनीही तशी मागणी होती. त्यावर सिडकोच्या घरांच्या किमती या 10 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिडकोच्या लॉटरीमधील जवळपास 17 हजार घरांच्या किमती यामुळे कमी होणार आहेत.
किंमतीत घट; सर्वसामान्यांना मोठा दिलासा
सिडकोच्या घरांच्या किमती या अव्वाच्या सव्वा होत्या. त्यामुळे सर्वसामान्यांना त्या परवडणाऱ्या नव्हत्या. परिणामी सिडकोच्या लॉटरीला हवा तितका प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे सिडकोच्या घरांच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात होती. राज्य सरकारने आता त्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, “मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी सरकारन मोठं पाऊल उचललं आहे. 50 एकरापेक्षा जास्तीच्या भूखंडावर पुर्नविकास योजना राबवण्यात येणार आहे. या ठिकाणी अत्यावश्यक सुविधा आपण देणार आहोत. मुंबईतील 17 ठिकाणी ही योजना आपण राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये घाटकोपरमधील रमाबाई नगरचाही विकास केला जाणार आहे.“
सामान्य नागरिकांना परवडतील अशा योजनांद्वारे घर उपलब्ध करून देणे हा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि कामगार वर्गालाही येथे घर घेण्याची संधी मिळते. सिडकोच्या योजनांमुळे नवी मुंबई आज गृहनिर्माण आणि विकासाच्या दृष्टीने देशातील एक आदर्श शहर म्हणून ओळखले जाते.





