Sankashti Chaturthi Naivedya Recipes: हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व आहे. संकष्टी चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित आहे. ही चतुर्थी प्रत्येक चंद्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या (अंधाऱ्या पंधरवड्याच्या) चौथ्या दिवशी येते. तसेच मंगळवारी येणाऱ्या संकष्टीला अंगारक संकष्टी म्हणतात. या दिवशी भक्त उपवास करतात आणि गणपती बाप्पाची पूजा करतात. त्यामुळेच आज आपण अंगारक संकष्टी चतुर्थीला बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवली जाणारी साबुदाण्याच्या खीरची रेसिपी पाहूया…
साबुदाणा खीर बनवण्यासाठी साहित्य-
साबुदाणा १ वाटी
दूध २ वाटी
चवीनुसार साखर
काजू, मनुका, पिस्ता (आवश्यकतेनुसार)
२ चमचे तूप
३ वेलची
साबुदाणा खीर बनवण्याची रेसिपी-
सर्वप्रथम साबुदाणा गरम पाण्यात भिजवा आणि एका भांड्यात ठेवा.
एका पॅनमध्ये तूप घालून ड्रायफ्रूट्स तळून एका प्लेटमध्ये ठेवा.
उरलेल्या तुपात वेलची घाला आणि साबुदाणा घाला.
साबुदाणा पारदर्शक झाला की त्यात साखर घाला.
त्यानंतर दूध घाला.
दूध उकळल्यानंतर ड्रायफ्रूट्स घाला आणि गॅस बंद करा.





