यंदाच्या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण 21 सप्टेंबर रोजी (Surya Grahan 2025) होणार आहे…. हे एक आंशिक सूर्यग्रहण असेल, जे 21 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजून 59 मिनिटांनी सुरू होईल आणि 22 सप्टेंबर रोजी पहाटे 03.24 वाजता संपेल. हे आंशिक सूर्यग्रहण असल्याने सूर्य पूर्णपणे झाकला जाणार नाही. हे ग्रहण अश्विन अमावस्येला कन्या राशीत आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात असेल. ग्रहणकाळात सूर्य, चंद्र आणि बुध हे सर्व कन्या राशीत असतील तर मीन राशीत राहणारा शनि त्यांच्यावर पूर्ण दृष्टी ठेवेल. सूर्यग्रहणामुळे काही राशींवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आज आम्ही तुम्हाला अशा 3 राशीबद्दल सांगणार आहोत, ज्यांना सूर्यग्रहणाचा मोठा फायदा होणार आहे या राशींच्या लोकांसाठी 21 सप्टेंबर पासून अच्छे दिन सुरू होणार आहेत.
1) वृषभ
वृषभ राशीच्या लोकांवर सूर्यग्रहणाचा खूप शुभ परिणाम होईल. तुमच्या आयुष्यात अनेक चमत्कारिक बदल अनुभवायला मिळतील. मागच्या काही महिन्यापासून तुमची काही कामे रखडली असतील तर ती 21 सप्टेंबर पासून सुराला लागू शकतात. तुमचं नशीब इतक्या उंचीवर असेल की जिथे तुम्ही लाथ माराल तिथे पाणी काढू शकाल. खास करून व्यावसायिक लोकांसाठी 21 सप्टेंबर नंतर मोठा फायदा होण्याची शक्यता आहे
2) सिंह Surya Grahan 2025
सिंह राशींच्या लोकांसाठी 21 सप्टेंबर ची सूर्यग्रहण आर्थिक भरभराट करणारे ठरेल. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी प्रमोशनची आणि पगारात वाढ होण्याची संधी आहे. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर 21 सप्टेंबर नंतर तुम्हाला नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात. या काळात तुम्हाला दागदागिने खरेदी करण्याची संधी मिळू शकेल. जुने मित्र भेटतील आणि बाहेर फिरण्याचा योग जुळून येईल.
तूळ –
तूळ राशीच्या लोकांसाठी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण (Surya Grahan 2025) अतिशय कमालीचे ठरणार आहे. या राशीच्या लोकांना अचानकपणे धनलाभ होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण अत्यंत सकारात्मक राहील… कामाच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल. 21 सप्टेंबर चा काळ तुमच्या कुटुंबासाठी अतिशय अनुकूल असेल… तुम्हाला नवीन घर खरेदी करण्याची किंवा जमीन खरेदी करण्याचा योग जुळून येईल.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





