Chanakya Niti In Marathi: आचार्य चाणक्य हे एक महान तत्वज्ञानी आणि धोरणकर्ते होते. त्यांनीच आपल्या कारकिर्दीत अनेक ग्रंथ लिहिले आहेत. या ग्रंथांमध्ये नीतिशास्त्र आजही तितकाच लोकप्रिय आहे. नीतिशास्त्रमध्ये आचार्य चाणक्यांनी आयुष्यातील विविध गोष्टींबाबत काही ना काही सल्ले दिले आहेत. यालाच चाणक्य नीती म्हणून ओळखले जाते.
चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी मनुष्याने कोणत्या परिस्थितीमध्ये कसे वर्तन करावे, कसे वर्तन करू नये, कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या गोष्टी करू नयेत याबाबत सविस्तर सांगितले आहे. असे म्हटले जाते की, चाणक्य नीतीचा वापर केल्यास यश नक्की मिळते. आजही अनेक लोक चाणक्य नीतीचा अवलंब करून आपल्या अडचणी दूर करतात. चाणक्यांनी लोकांना श्रीमंत होण्यासाठी काय करावे याबाबतही सल्ले दिले आहेत. आज आपण त्याबाबतचा जाणून घेऊया…..
आळस-
आचार्य चाणक्यांच्या मते आळशीपणामुळे माणूस कधीच यशस्वी होऊ शकत नाही. हो व्यक्ती सतत आळस करतो टाळाटाळ करतो त्याच्याजवळ कधीच स्थायी धन राहात नाही. त्यामुळे अशी लोक कधीच श्रीमंत होत नाहीत. चाणक्य नीतीनुसार श्रीमंत बनायचे असेल तर सर्वात आधी आळस सोडला पाहिजे. आळशीपणामुळे प्रगतीच्या चांगल्या संधी तुमच्या हातातून निघून जातात आणि त्यासोबतच पैसाही निघून जातो. त्यामुळे अशी लोकं कधीही श्रीमंत होत नाहीत.
वाईट संगत-
चाणक्य नीतीनुसार, वाईट संगत तुम्हाला चुकीच्या दिशेला घेऊन जाते. यामुळे तुमच्या पैशांचे तर नुकसान होतेच शिवाय तुमची पदप्रतिष्ठासुद्धा कमी होते. समाजात तुमची प्रतिमा वाईट होते. त्यामुळे तुम्ही अनेक संधी घालवता. त्यामुळे पैसाही मिळत नाही. आणि अशामुळे ती व्यक्ती कधीच श्रीमंत बनू शकत नाही.
पैशांचा गैरवापर-
चाणक्य नीतीनुसार, पैसे नेहमीच विचारपूर्वक खर्च करावेत. तसेच पैशांचा वापर योग्य ठिकाणी करावा. जो व्यक्ती विचार न करता पैसे खर्च करतो त्याच्याजवळ पैसे राहात नाहीत. त्यामुळे अशी व्यक्ती आर्थिक अडचणींचा सामना करतो. म्हणून विचार न करता पैसे खर्च करणारा व्यक्ती कधीच श्रीमंत होऊ शकत नाही.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





