संकष्टी चतुर्थीचं महत्त्व काय, का करावा संकष्टीचा उपवास जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व

Asavari Khedekar Burumbadkar
संकष्टी चतुर्थी हे श्री गणेशाच्या उपासनेचे एक महत्त्वाचे पर्व आहे. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने, घरात सुख-समृद्धी येते आणि अडचणी दूर होतात, अशी मान्यता आहे. गणेशाला विघ्नहर्ता मानलं जातं, गणपती भाविकांची प्रत्येक संकटे, त्रास आणि अडथळे दूर करतो, म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यात प्रथम गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे. संकष्टीचे व्रत पाळणाऱ्या भाविकांची संकटे दूर होतात, असे मानले जाते. बुधवारी आलेल्या संकष्टीच्या व्रताबद्दल अधिक जाणून घेऊया

संकष्टी चतुर्थीचा उपवास का करावा?

संकष्टी चतुर्थीचा उपवास करणे म्हणजे श्री गणेशाची कृपा प्राप्त करणे. या उपवासाने जीवनातील अडचणी दूर होतात, इच्छा पूर्ण होतात आणि घरात सुख-समृद्धी येते. संकष्टी चतुर्थीच्या उपवासाने संकटातून मुक्तता मिळते आणि प्रतिकूल काळ दूर होतो. या दिवशी गणेशाची आराधना केल्याने माणसाच्या इच्छा पूर्ण होतात आणि घरात सुख-समृद्धी येते. 

संकष्टीच्या व्रताची संपूर्ण पद्धत

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. घरी गणेशाची मूर्ती स्थापित करा. गणेशाला आवडणारे लाल किंवा पिवळे कपडे आणि आसन तयार करा. गणेशाला लाल वस्त्र अर्पण करा आणि फुलांनी आणि अगरबत्तीने सजावट करा. मोदक किंवा लाडू प्रसाद म्हणून ठेवा. मंत्राचा जप करा आणि गणेश अथर्वशीर्ष किंवा गणेश स्तोत्र म्हणा. चंद्रोदयानंतर, चंद्राला अर्घ्य अर्पण करा आणि उपवास सोडा. संकष्टी चतुर्थीचा उपवास गणेशाला समर्पित आहे आपल्या जीवनातील अडचणी आणि संकटांवर मात करण्यासाठी केला जातो. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने गणेशाची कृपा प्राप्त होते आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात.

संकष्टी चतुर्थी चंद्रोदय वेळ

एप्रिल महिन्यात संकष्टी चतुर्थी १६ एप्रिल २०२५, बुधवार रोजी येत आहे. या दिवशी चंद्रोदय रात्री ९.४५ मिनिटांनी होईल. या दिवशी चंद्रोदयाचे विशेष महत्व असते. चंद्रोदयाच्या वेळेनंतर चंद्राला अर्घ्य देण्याची परंपरा आहे. या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला अर्घ्य दिल्यास व्रत पूर्ण मानले जाते अशी मान्यता आहे.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्या