मुंबईतील वाढती गुन्हेगारी अलीकडे चांगलाच चर्चेचा विषय ठरताना दिसत आहेत. त्यामध्ये आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा मृतदेह सापडल्याची घटना घडली आहे. शिवाय या तरुणीच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा देखील दिसून येत आहे. पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
तरूणीची हत्या झाल्याचा संशय
या प्रकरणातील काही महत्वाच्या बाबी विचारात घेतल्यानंतर हा तरूणीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या मृत तरुणीच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा देखील दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच कफ परेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती पाहून काहींना धक्का बसला. पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरु केला आहे. मात्र हि हत्या आहे कि आत्महत्या हे अद्याप कळू शिकलेलं नाहीये. सध्या पोलीस या घटनेचा त्या दिशने तपास करत असून या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे . मिळालेल्या माहितीनुसार, हा मृतदेह सध्या शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मनिता गुप्ता असं या 24 वर्षीय तरुणीचं नाव असून तरुणी कालपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

महिला सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर
मुंबईतील महिला सुरक्षेचा प्रश्न आज गंभीर बनला आहे. महानगर असल्याने येथे रोजगार, शिक्षण आणि व्यवसायासाठी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी होणारे छेडछाड प्रकार, रात्रीच्या वेळी प्रवासातील असुरक्षितता आणि कामाच्या ठिकाणी होणारा त्रास हे मुद्दे गंभीर मानले जातात. जरी मुंबई इतर शहरांच्या तुलनेत सुरक्षित मानली जाते, तरीही महिला सुरक्षेसंदर्भात सतर्कता आवश्यक आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, महिला पोलिस गस्त, हेल्पलाईन सुविधा आणि कायद्याची कडक अंमलबजावणी या उपाययोजना राबविल्या जात आहेत. महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी समाजाने, प्रशासनाने आणि कायदा व्यवस्थेने एकत्र येणे गरजेचे आहे.











