गोल्डी ब्रार टोळी थेट दिशा पटानीच्या जीवावर उठली; पहाटेच्या वेळी दिशाच्या घरावर गोळीबार, भयंकर सत्य समोर

Rohit Shinde

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या बरेली येथील घराबाहेर शुक्रवारी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घरात सध्या दिशा पाटनीचे वडील, निवृत्त डिप्टी एसपी जगदीश पाटनी राहतात.  शुक्रवारी साडेचार वाजताच्या सुमारास दोन अज्ञात इसम मोटरसायकलवरून आले आणि सिव्हिल लाईन्स परिसरातील घराच्या मुख्य दरवाजावर तसेच भिंतीवर चार-पाच फायरिंग केली.  गँगस्टर रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत दिशा पाटनीची बहीण खुशबू पाटनी हिने प्रेमानंदजी महाराज आणि अनिरुद्धाचार्य यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा बदला घेतल्याचा दावा केला.

दिशाच्या घरावरील गोळीबारामुळे खळबळ

आज पहाटे 3.30 ते 4 च्या आसपास हा गोळीबार झाल्याचे समोर आली आहे. या गोळीबाराची जबाबदारी रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार टोळीने घेतली आहे. सध्या या गोळीबारात कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर तातडीने पोलिस फोर्स घराबाहेर तैनात करण्यात आला असून एसपी सिटी व एसपी क्राईम यांच्या नेतृत्वाखाली पाच विशेष पथके तपासासाठी नियुक्त करण्यात आली आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे 3.30 वाजता निवृत्त सीईओ जगदीश पटानी यांच्या घरी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांची पथके तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आली होती. या घटनेची पुष्टी होताच, गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

हल्ल्याचे कारण नेमके काय? 

हल्लेखोर टोळीकडून आलेल्या स्पष्टीकरणानुसार , दिशा पाटनीची बहीण खुशबू पाटनी हिने प्रेमानंदजी महाराज आणि अनिरुद्धाचार्य यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा बदला घेतल्याचा दावा केला. तसेच संत आणि धर्मांविरोधात बोलणाऱ्यांना परिणाम भोगावा लागेल, अशी उघड धमकीही दिली. पण, ही पोस्ट नंतर डिलीट करण्यात आली आहे. गोल्डी ब्रार हा तोच आहे ज्याने सलमान खानला धमकी दिली आहे.  याबाबत अधिक तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या