आयटीचा जॉब मिळविण्याचे स्वप्न पडले महागात; पुण्यात हिंजवडी आयटी पार्कमध्ये उमेदवारांची कोट्यवधींची फसवणूक!

400 ते 500 आय.टी फ्रेशर्स इंजिनीयर उमेदवारांची फ्लायननोट सॉस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी योग्य ती सावधानता बाळगणे आवश्यक आहे.

आजकाल आयटी क्षेत्रात जॉब मिळविण्याची प्रचंड ओढ तरुणांमध्ये दिसून येते. उच्च पगार, चांगल्या सुविधा आणि स्थिर करिअर यांची स्वप्ने पाहून अनेक विद्यार्थी व नोकरी शोधणारे आकर्षित होतात. परंतु या ओढीचा गैरफायदा काही फसवेगिरी करणारे लोक घेतात. बनावट कन्सल्टन्सी, खोट्या ऑफर लेटर, नोकरीसाठी आधीच पैसे भरण्याच्या अटी यामुळे अनेक तरुणांची आर्थिक फसवणूक होते. पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्कमधून खरंतर अशाच एका घटनेचा उलगडा झाला आहे.

हिंजवडीत उमेदवारांची कोट्यवधींची फसवणूक

हिंजवडी आयटी पार्क येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहेयात अंदाजे 400 ते 500 आय.टी फ्रेशर्स इंजिनीयर उमेदवारांची फ्लायननोट सॉस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. उपेश रंजीत पाटील यांनी कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहेया प्रकरणी पाटील यांना हिंजवड  पोलिसांन अटक करत बेड्या ठोकल्या असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेली माहितीनुसार, उपेश रंजीत पाटील यांनी वेगवेगळ्या कन्सल्टीचे मार्फतीने फ्रेशर्स इंजिनीयर उमेदवारांना मोठ्या वार्षिक पगाराचे अमिष दाखवलेतसेच उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात आगऊ रक्कम स्वीकारून त्यांना कामाला लावतो, अस सांगून आणि विश्वास संपादन करून स्वतःच आर्थिक फायदा करून घेतलासोबतच फ्रेशर्स इंजिनीयर उमेदवारांची कोट्यावधी रुपयाची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणात हिंजवडी पोलीस स्टेशन येथे उपेश रंजीत पाटील आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जॉब मिळविताना अधिकृत स्त्रोत तपासा!

दरम्यान, ज्या तरुणांची उपेश पाटील यांच्या प्लायनोट सॉस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांनी फसवणूक केले आहे. त्यांनी हिंजवडी पोलीस स्टेशन आणि फोरम फॉर आयटी एम्प्लॉईजशी तातडीने संपर्क साधावा, अस आवाहन फोरमचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी केला आहे. फोरमचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी केला आहे. नोकरीच्या आशेवर लाखो रुपये गमावल्यामुळे निराशा आणि मानसिक ताण वाढतो. अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी सावधगिरी बाळगणे, अधिकृत स्त्रोतांवरच विश्वास ठेवणे आणि पडताळणी करूनच निर्णय घेणे आवश्यक आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News