संभाजीनगर- उद्योगपती संतोष लड्डांच्या घरावरील दरोडा प्रकरणात पुन्हा ट्विस्ट आलाय. एन्काऊंटरमध्ये मारला गेलेला आरोपी अमोल खोतकरची बहीण रोहिणीनंचं सगळं सोनं लपवल्याचे धागेदारे पोलिसांच्या हाती लागलेत.
दरोड्यानंतर याच रोहिणी खोतरकरनं एक फ्लॅट खरेदी केल्याचं समोर आलंय त्यापार्श्वभूमीवर गुन्हे शाखेने रोहिणी खोतकरला हरसुल कारागतून पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतलंय.

नमेका कसा पडला होता दरोडा?
15 मेच्या रात्री सहा दरोडेखोरांनी उद्योजक संतोष लड्डांच्या घरावर दरोडा टाकला होता. यात साडेपाच किलो सोनं आणि 32 किलो चांदी लुटून नेली होती. 26 मे रोजी पोलीस चकमकीत अमोल खोतकरचा एन्काऊंटर झाला. कोट्यावधीचे सोने, चांदी अमोल खोतकरनं लपवल्याचा संशय व्यक्त होत होता. दरोड्याप्रकरणी 21 आरोपींना आतापर्यंत बेड्या ठोकण्यात आल्या.
आत्तापर्यंत 22 तोळे सोने जप्त , मात्र उतर सोनं कुणाकडे आहे, याचा तपास अद्यापही लागलेला नाही. एका गॅरेज समोर उभ्या कारमधून तब्बल 31 किलो 300 ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली. 23 लाख 14 हजाररोख रक्कम जप्त करण्यात आली.
कुठं सापडलं आत्तापर्यंत सोनं?
एन्काऊंटरमध्ये मारला गेलेला आरोपी अमोल खोतकरच्या घरातच 22 तोळे सोनं आढळलंय. झाडाच्या कुंड्या, तुळशी वृंदावनातून 7 जिवंत काडतुसांसह 22 तोळे सोनं हस्तगत केलंय. त्यामुळं पोलिसांनी आता मृत अमोलची बहीण रोहिणी खोतकरला बेड्या ठोकल्या आहेत
बाईक रायडिंगवेळी वापरलं जाणार हँडग्लोज, त्यात एका पिशवीत सोन्याची चेन, ब्रेसलेट ठेवण्यात आले होते. दरोड्यातील सोनं ठेवलेला हँडग्लोज तुळशीवृंदावनात मातीमध्ये लपवला होता. झाडाच्या कुंडीत 7 जिवंत काडतुसं लपवली होती.
लड्डांचा मित्रच दरोड्याचा मास्टरमाईंड
संभाजीनगरातील उद्योजक संतोष लड्डांच्या घरावरील दरोड्याचा मास्टरमाईंड त्यांचा मित्र बाळासाहेब इंगोले असल्याचं समोर आलंय. लड्डांचा अत्यंत विश्वासू असलेल्या इंगोलेनंच दरोडासंदर्भात पहिली टीप दिली होतीसंतोष लड्डा आणि बाळासाहेब इंगोले एकाच गावचे आहेत.शाळेत असताना लड्डा-इंगोले वर्गमित्र होते. बाळासाहेब इंगोले हा 20 वर्षांपासून संतोष लड्डांच्या कंपनीत नोकरीला होता. लड्डांच्या आर्थिक देवाणघेवाणबाबत इंगोलेला सर्व माहिती होती. बाळासाहेब इंगोलेचंसंतोष लड्डांच्या घरी येणंजाणं होतं
आतातरी सगळं सोनं सापडणार?
लड्डांच्या घरातील रोकड, सोनं-चांदी याबाबतची पहिली टीप इंगोलेनं दिली होती. घरात तब्बल साडेपाच किलो सोन ठेऊन लड्डा परदेशात फिरायला गेले. हीच संधी साधून लड्डांचा जिगरी मित्र आणि अत्यंत विश्वासू बाळासाहेब इंगोलेन दरोडासंदर्भात पहिली टीप आरोपींना दिली.
दरोडेखोरांनी डाव साधत साडेपाच किलो सोनं आणि 32 किलो चांदी लुटून नेली. मात्र आतापर्यंत केवळ 22 तोळे हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळालंय. आता हे सोनं एन्काऊंटरमध्ये मारला गेलेला आरोपी अमोल खोतकरची बहिणी रोहिणीच्या दिशेनं धागेदोरे पोहोचलेत. त्यामुळं आतातरी दरोड्यातील सोन हस्तगत करण्यात पोलिसांना यश येते का हे पाहणं महत्त्वाचं असेल