बॉलिवूडमधील परफेक्ट जोडींमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. दोघांनीही जबरदस्त चित्रपट देऊन चाहत्यांच्या मनावर गारूड केलं आहे. त्यांचे चित्रपट केवळ प्रेक्षकांच्या हृदयातच नाही तर बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करतात. दोघेही चित्रपट, जाहीरात, ब्रँड एडोर्समेंट आणि विविध माध्यमातून मजबूत कमाई करतात. त्या दोघांची एकूण संपत्ती साधारण ७०० कोटींहून अधिक असल्याचं सांगितलं जातं. मात्र या दोघांमध्ये कोणाची नेटवर्थ सर्वाधित आहे, माहीत आहे?
आलिया, रणबीर सर्वात पुढे…
2021 मध्ये आलियाची एकूण संपत्ती ५१७ कोटी होती. याच्या तुलनेत डफ आणि फेल्प्सच्या अनुसार, गेल्या वर्षी रणबीरची एकूण संपत्ती २०३ कोटी होती. उद्योग क्षेत्रातील सूत्रांनुसार, तेव्हापासून दोघांच्या कमाईची मोठी वाढ पाहायला मिळत आहे. ज्यामुळे त्यांची एकूण संपत्ती ७२० कोटींपर्यंत पोहोचली आहे.
आलियाची संपत्ती…
आलिया भट्टच्या नावावर वांद्र्यात ३२ कोटींचा बंगला आहे. याशिवाय तिची नवी प्रोडक्शन कंपनी इटरनल सनशाइन प्रोडक्शनसाठी ऑफिस स्पेसची किंमत कथितपणे दोन कोटी रुपये आहे. इंग्लंडमध्येही तिचं एक घर आहे. तिच्याकडे लँड रोवर रेंज रोवर वोग कार असून त्याची किंमत साधारण दोन कोटी आणि एक बीएमडब्ल्यू ७ सीरिज जी १.७६ कोटींपर्यंत आहे. आलिया सध्या एका प्रोजेक्टसाठी १५-१८ कोटी आकारते. आर्थिक सल्लागार कंपनी डफ अँड फेल्प्सने २०२१ मध्ये भारतातील सहाव्या सर्वात मौल्यवान सेलिब्रिटी म्हणून आलियाच्या नावाचा उल्लेख केला आहे.
क्वालिटी वॉल्स कॉर्नेटो, लेज, फ्रूटी, ड्युरोफ्लेक्स, मान्यवर, कॅडबरी आणि फ्लिपकार्ट सारख्या ब्रँड्सनी आलियाला ब्रँड अॅम्बेसेडर बनवलं आहे. असे म्हटले जाते की ती एका एंडोर्समेंट शूटसाठी दररोज सुमारे २ कोटी रुपये घेते.
दुसरीकडे रणवीर प्रत्येक चित्रपटासाठी ५० कोटी आकारतो. म्हणजे आलियाहून साधारण तीनपट. तो ओप्पो, टाटा एआयजी, कोका-कोला आणि ओरियोसारख्या मोठ्या ब्रँडच्या जाहिराती करतो. कथितपणे या ब्रँड शूटसाठी तो साधारण सहा कोटी आकारतो.











