पवन कल्याणच्या ‘OG’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान इमरान हाशमीला डेंग्यूची लागण, रुग्णालयात दाखल

इमरान हाश्मी सध्या साउथचा पॉवर स्टार पवन कल्याण याच्या ‘OG’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता, परंतु आता त्याला शूटिंग थांबवावी लागली आहे.

Emraan Hashmi Diagnosed With Dengue : इमरान हाश्मी सध्या साउथचा पॉवर स्टार पवन कल्याण याच्या ‘OG’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता, परंतु आता त्याला शूटिंग थांबवावी लागली आहे. कारण, ‘OG’च्या शूटिंगदरम्यान इमरानला डेंगू झाला आहे.

OG च्या शूटिंग दरम्यान इमरानला डेंग्यू झाला

विरल भयानी यांच्या पोस्टनुसार, ”बॉलिवूड स्टार इमरान हाश्मीला आता डेंग्यू झाल्याचे वृत्त आहे. तो पॉवर स्टार पवन कल्याणसोबत त्याच्या आगामी पॅन-इंडियन चित्रपट OG चे शूटिंग करत होता.

वृत्तानुसार, तो मुंबईतील गोरेगाव येथील आरे कॉलनीमध्ये शूटिंग करत होता जिथे त्याला डेंग्यूची लक्षणे जाणवू लागली. चित्रपटाच्या निर्मिती युनिटच्या जवळच्या सूत्रांनी पुष्टी केली आहे की इमरान हाश्मी आता बरा होत आहे आणि त्याने काही काळासाठी शूटिंगमधून ब्रेक घेतला आहे.”

चित्रपटाचं नाव ‘दे कॉल हिम ओजी‘ 

साउथ स्टार पवन कल्याणचा आगामी चित्रपट ‘ओजी’ (‘दे कॉल हिम’ ओजी) हा एक आगामी गँगस्टर अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट सुजीत दिग्दर्शित करत आहे. पवन कल्याण व्यतिरिक्त, इमरान हाश्मी आणि प्रियांका मोहन या चित्रपटात दिसणार आहेत. हा इमरानचा पहिला तेलुगू चित्रपट आहे. थमन या चित्रपटाचे संगीत देत आहेत.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News