नेटफ्लिक्सवर सध्या गाजत असलेला विनोदी कार्यक्रम ‘द ग्रेट कपिल शर्मा शो’ एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यावेळी वाद निर्माण झाला आहे. शोमधील एका विनोदी स्किटमुळे, ज्यामध्ये कीकू शारदा यांनी हेराफेरी या लोकप्रिय चित्रपटातील बाबूराव गणपत राव आपटे या व्यक्तिरेखेची नक्कल केली.हा स्किट प्रेक्षकांना हास्याची डोस देण्यात यशस्वी ठरला असला, तरी मूळ हेराफेरी चित्रपटाचे निर्माता फिरोज नाडियाडवाला (Firoj Nadiadwada Kapil Sharma Show) यांना हा प्रकार फारसा पसंत पडलेला नाही. त्यांच्या मते, बाबूराव ही व्यक्तिरेखा केवळ एक पात्र नसून हेराफेरी चित्रपट मालिकेचा आत्मा आहे आणि त्या पात्राच्या बौद्धिक संपत्तीचा (Intellectual Property) विनाअनुमती वापर करणे हे गंभीर उल्लंघन आहे.
काय आहे प्रकरण? Firoj Nadiadwada Kapil Sharma Show
द ग्रेट कपिल शर्मा शो मध्ये विविध नामवंत कलाकारांच्या भूमिका, बोलण्याची शैली आणि वेशभूषेची नक्कल करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले जाते. यापूर्वी कृष्णा अभिषेकने धर्मेंद्र आणि जॅकी श्रॉफ यांची नक्कल साकारून सर्वांचे लक्ष वेधले होते. परंतु, या वेळेस कीकू शारदा यांनी “बाबूराव” म्हणून प्रसिद्ध असलेल्या परेश रावल यांच्या व्यक्तिरेखेचे हुबेहूब अनुकरण केल्यामुळे वाद निर्माण झाला. या प्रकारामुळे हेराफेरी मालिकेचे सर्वाधिकार असणाऱ्या फिरोज नाडियाडवाला यांनी नेटफ्लिक्स आणि शोच्या निर्मात्यांना कॉपीराइट अॅक्ट १९५७ च्या कलम ५१ आणि ट्रेडमार्क अॅक्ट च्या कलम २९ अंतर्गत कायदेशीर नोटीस बजावली आहे. Firoj Nadiadwada Kapil Sharma Show

काय आहे नोटीसमध्ये?
नाडियाडवाला यांच्या वकिलांनी दिलेल्या नोटीसनुसार, “बाबूराव ही व्यक्तिरेखा अत्यंत विचारपूर्वक, सर्जनशीलता आणि मेहनतीने तयार करण्यात आली होती. परेश रावल यांनी या भूमिकेला प्राण दिला आहे. ही भूमिका हेराफेरीच्या यशाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे कोणत्याही तृतीय पक्षाला, विनाअनुमती आणि व्यावसायिक हेतूने, या पात्राचा वापर करण्याचा अधिकार नाही. यासोबतच त्यांनी २५ कोटी रुपयांची नुकसानभरपाईची मागणी केली आहे आणि नेटफ्लिक्स व शो निर्मात्यांनी याबद्दल सार्वजनिक माफी मागावी, अशीही अट घातली आहे. भविष्यात अशी चूक पुन्हा होऊ नये याची हमीदेखील मागण्यात आली आहे. Firoj Nadiadwada Kapil Sharma Show
दरम्यान, अनेक वेळा कॉमेडी शोजमध्ये लोकप्रिय चित्रपट पात्रांची नक्कल केली जाते. मात्र जेव्हा त्या पात्रांवर आधीपासूनच कॉपीराइट किंवा ट्रेडमार्कचे अधिकार असतात, तेव्हा त्याचा वापर केवळ मनोरंजनासाठी झाला तरी तो कायद्याच्या चौकटीत बसतो का, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हेराफेरी मालिकेच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. खुद्द परेश रावल यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत सांगितलं की, हेराफेरी ३ चे शूटिंग फेब्रुवारी २०२६ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. यामध्ये पुन्हा एकदा अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल एकत्र दिसणार आहेत. दिग्दर्शन प्रियदर्शन करणार आहेत, जे या मालिकेच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शक होते.
कपिल शर्मा शोचा शेवटचा भाग
कपिल शर्मा शोच्या तिसऱ्या सिझनचा अंतिम भाग २० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अभिनेता अक्षय कुमार विशेष पाहुण्या म्हणून सहभागी होणार आहेत. या भागानंतर या सिझनचा समारोप होईल. या प्रकरणातून स्पष्ट होते की मनोरंजन आणि कॉपीराइट यामध्ये सीमारेषा अधिक स्पष्ट करणं अत्यंत आवश्यक बनलं आहे. हास्य आणि विनोदाच्या माध्यमातून प्रेक्षकांना आनंद देणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच इतरांच्या सर्जनशीलतेचा आदर राखणंही गरजेचं आहे. आता हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की नेटफ्लिक्स आणि कपिल शर्मा शो यावर काय प्रतिक्रिया देतात, आणि या कायदेशीर वादाचा शेवट नेमका कुठे होतो.