Hema Malini : विवेज परिषद भारत सरकारचा हा अतिशय स्तुत आणि सुंदर उपक्रम आहे. याचा मला एक भाग होता आले त्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. ही परिषद महाराष्ट्रातील मुंबईत पहिल्यांदा होत आहे. यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले आहेत. या चर्चासत्रात ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी, प्रसिद्ध मळ्याम अभिनेते मोहनलाल, प्रसिद्ध अभिनेते चिरंजीव यांनी सहभाग घेतला होता. तर याचे सूत्रसंचालन खिलाडी अभिनेता अक्षय कुमारने केले.
या परिषदेजा मला एक भाग होता आल्याने मला आनंद होत आहे, यातून त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल आणि भविष्यात या क्षेत्रात भारत आणखी पुढे जाईल, असे कौतुकोद्गार ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी परिषदेच्या ‘व्यक्तिमत्व आणि त्यांचा वारसा’ या चर्चासत्रात काढले.

कथानक लोकांच्या हृदयाला स्पर्श करते…
दरम्यान, दोन्ही एका प्रकारचेच कथानक आहेत. जे कथानक लोकांच्या हृदयाला स्पर्श करते, ते कथानक लोकांना भावते. असं प्रसिद्ध मल्याळम अभिनेते मोहनलाल यांनी उद्गार काढले. विकसित भारत होण्यासाठी मार्गक्रमण करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिएटिव्ह कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी एक व्यासपीठ निर्माण केले. मी कलात्मक आणि व्यावसायिक चित्रपटांमधील भेदभाव करत नाही. मनोरंजन आणि कलाक्षेत्रात भारताने मोठी झेप घेतली आहे. समांतर सिनेमा आणि मनोरंजन सिनेमा याच्यात सूक्ष्म फरक आहे, असं प्रसिद्ध मल्याळम अभिनेते मोहनलाल म्हणाले.
लहानपणापांसूनच चित्रपटाची आवड…
दुसरीकडे मी नेहमीच चांगले काम करण्याचा प्रयत्न केला, एका अभिनेता होण्यासाठी जी मेहनत लागते, ती मेहनत मी केली. या चर्चासत्रात बोलताना चिरंजीवी म्हणाले की, लहानपणापासूनच मला चित्रपटाची आवड होती. सुरुवातीच्या काळात मी खूप मेहनत आणि धडपड केली. महानायक अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, कमल हसन हे माझे आदर्श आहेत. आणि यांच्यासारखेच होण्याचा मी प्रयत्न केला. भविष्यात सोशल मीडिया आणि तंत्रज्ञ हे आपणाला स्वीकारावाच लागेल, असं अभिनेता चिरंजीवी म्हणाले.