Shraddha Kapoor : बॉलीवूड आणि हॉलीवूडच्या मोठ्या चित्रपटांची टक्कर बॉक्स ऑफिसवर कायम दिसत असते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तेरे इश्क में’ या एक्शन-रोमँटिक चित्रपटासोबत डिस्नीची बहुप्रतीक्षित अॅनिमेटेड फिल्म ‘जूटोपिया 2’ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीत अभिनेत्री श्रद्धा कपूरने जूडी हॉप्स या लोकप्रिय पात्राला आवाज दिला असून, तिच्या या डबिंग फीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
‘जूटोपिया 2’च्या रिलीजपूर्वी श्रद्धाने (Shraddha Kapoor) सोशल मीडियावरूनच चाहत्यांना ही आनंदवार्ता दिली होती की ती जूडी हॉप्सची हिंदी आवाजकलाकार म्हणून काम करत आहे. तिच्या या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आणि चित्रपट रिलीज झाल्यानंतर श्रद्धाच्या आवाजाला मिळालेल्या प्रतिसादाने ती आणखी चर्चेत आली.

श्रद्धाने किती मानधन घेतले (Shraddha Kapoor)
रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा कपूरने या डबिंग प्रोजेक्टसाठी तब्बल 1 ते 1.5 कोटी रुपये मानधन घेतले आहे. विशेष म्हणजे, डबिंगसाठी मिळालेल्या रकमेमध्ये ही आतापर्यंतच्या सर्वाधिक फींपैकी एक मानली जात आहे. मात्र, चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी केलेली नाही. तरीही श्रद्धाच्या चाहत्यांमध्ये तिच्या डबिंग कमाईबद्दल प्रचंड चर्चा रंगली आहे. श्रद्धा कपूरने आपल्या या नवीन प्रोजेक्टबद्दल आनंद व्यक्त करत चाहत्यांना ‘जूटोपिया 2’ अवश्य पाहण्याचे आवाहन केले होते. अभिनयाबरोबरच डबिंग क्षेत्रातही तिची दमदार एन्ट्री झाल्याचे चाहते म्हणत आहेत.
कसे आहे श्रद्धाचे करिअर
श्रद्धाच्या करिअरवर नजर टाकली तर 2013 मध्ये ‘आशिकी 2’मधून लीड अभिनेत्री म्हणून पदार्पण केल्यानंतर तिने ‘एक व्हिलन’, ‘हैदर’, ‘छिछोरे’, ‘तू झूठी मैं मक्कार’, ‘स्त्री’ आणि ‘स्त्री 2’सारख्या अनेक हिट चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता लवकरच ती मराठी चित्रपट ‘ईथा’मध्येही झळकणार असून, तिच्या या बहुप्रतिक्षित प्रोजेक्टकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.