Free Toll : या प्रवाशांना Toll Free!! सरकारने दिली खुशखबर

Asavari Khedekar Burumbadkar

Free Toll : आपल्या भारतात खाजगी गाडीने कुठे फिरायचं म्हटलं तर टोल हा भरावाच लागतो मग तो राज्य महामार्ग असो वा राष्ट्रीय महामार्ग … चारचाकी वाहनाना टोल भरल्याशिवाय लांबचा प्रवास करणे शक्य नसते…. काही दिवसांपूर्वीच सरकारने fastag पद्धत अंमलात आणली आहे. या fastag च्या माध्यमातून दरवर्षी 3000 रुपयांचा वार्षिक पास सरकारकडून दिला जातोय. परंतु काही दिवसांपूर्वी सरकारने टोल संदर्भात आणखी एक नवा नियम लागू केला होता तो तुम्हाला माहिती आहे का?? चला तर मग आज आम्ही तुम्हाला तुमच्या कामाची बातमी सांगत आहोत. आता टोल प्लाजा पासून 20 किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना टोल भरावा लागत नाही. म्हणजेच काय तर जर तुमचे घर टोल प्लाजा पासून जवळच असेल तर तुम्हाला टोल टॅक्स भरावा लागणार नाही

काय आहे नवा नियम ? Free Toll

२४ सप्टेंबर २०२४ पासून लागू झालेल्या ‘जितनी दूरी उतना टोल’, या धोरणांतर्गत जीएनएसएस प्रणालीद्वारे ट्रॅक केलेल्या वाहनांना २० किमीपर्यंतच्या प्रवासासाठी टोल सूट लागू केली आहे. यासाठी आपल्याला निवासस्थानाचा पुरावा म्हणून अधिकृत कागदपत्र सादर करावे लागतील. गेल्या वर्षी सुरु झालेल्या या नव्या धोरणाअंतर्गत एक खास प्रणाली ऍक्टिव्ह करण्यात आली आहे. या खास प्रणालीला जीएनएसएस प्रणाली असे संबोधले जाते आणि या प्रणाली द्वारे ट्रॅक करण्यात आलेल्या वाहनांना वीस किलोमीटरच्या परिघात टोल सुट लागू केली जाते. ज्यांचे घर तोल नाक्या पासून जवळ आहे अशा लोकांसाठी सरकारचा हा नवा टोल नियम फायदेशीर ठरतोय. Free Toll

कोणाकोणाला टोल माफी?

देशात केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकृत वाहने, पोलीस वाहने, रूग्णावाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनाही टोल माफी आहे. तसेच भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या वाहनांनाही कोणत्याही प्रकारचा टोल आकारला जात नाही. याशिवाय, एनडीआरएफच्या वाहनांनाही टोलमधून सूट आहे.

ताज्या बातम्या