आनंदाची बातमी! मुंबईकरांचे पाण्याचे टेन्शन खल्लास, वर्षभर पुरले एवढे धरण साठ्यात पाणी

यावर्षी पाऊस चांगला पडला आहे. पाऊस अजूनही बरसत आहे. परिणामी मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे तुडूंब भरली आहे. ही सातही धरणे आता १०० टक्के क्षमतेने भरली आहेत. अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

Mumbai – यावर्षी 27 मे रोजी राज्यात मान्सून दाखल झाल्याचा दावा हवामान विभागाने केला आहे. तर मुंबईसह राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार बॅटिंग केली आहे. यावर्षी पावसाने वेळेपेक्षा अधिच दमदार सुरुवात केली होती. किंबहुना मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याबाबत एक मोठी आणि खुशखबर समोर येत आहे. यावर्षी तुफान पडलेल्या पावसामुळं मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणे शंभर टक्के तुडुंब भरलेली आहेत, त्यामुळं मुंबईकरांना वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा धरणांमध्ये असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली आहे.

मुंबईला दररोज किती पाणी लागते

मुंबईत सध्या 22,000 पेक्षा अधिक जलजोडण्या करण्यात आल्यात. यामुळं पाण्याची जी चोरी होत होती. ती कमी झाली आहे. तसेच पाण्याची गळती रोखण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून, जमिनीखाली गळती शोधून दुरुस्त करणे मोठे आव्हानात्मक काम असते. पण पालिका प्रशासन तंत्रज्ञानाचा वापर करुन पाणी गळती थांबवत आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही धरण फुल्ल झाल्यामुळं पुढील वर्षापर्यंत मुंबईकरांनी पाण्याची चिंता करु नये, असं पालिकेचे जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी माहिती दिली आहे.

सध्या मुंबईला अप्पर वैतरणा, तानसा, मोडक सागर, विहार तलाव, पवई तलाव, तुळशी तलाव, भातसा तलाव ही सात प्रमुख धरणातून पाणीपुरवठा केला जातो. तर मुंबईकरांना दररोज साधारण 4000 दशलक्ष लिटर पाणी लागते. मुंबईतील वाढती लोकसंध्या लक्षात घेता भविष्यात आणखी धरण बांधले जाणार आहेत. सध्या गारगाई धरणाचे काम सुरु आहे.

पाणीपुरवठा करणारी सातही धरणे १००% फुल्ल…

दरम्यान, मुंबईकरांच्या पाण्याच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे. कारण यावर्षी पाऊस चांगला पडला आहे. पाऊस अजूनही बरसत आहे. परिणामी मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे तुडूंब भरली आहे. ही सातही धरणे आता १०० टक्के क्षमतेने भरली आहेत. या धरणातून पुढील वर्षभर मुंबईकरांना पाणीपुरवठा होईल, एवढा पाणीसाठा आहे. या सातही धरणातील मुबलक पाणी साठ्यामुळे मुंबईकरांची जून 2026 पर्यंत पाण्याची तहान भागणार असून, मुंबईकरांवरील पाणी कपातीचे संकट टळले आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News