MP Breaking News
Mon, Dec 15, 2025

महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, ३१ जिल्ह्यांना येलो तर बीडसह ५ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

हवामान खात्याने पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ३१ जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट तर ५ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, ३१ जिल्ह्यांना येलो तर बीडसह ५ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain News:   महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विविध जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे. पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजा चिंतेत आहे.

दरम्यान हवामान खात्याने पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ३१ जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट तर ५ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे ते आपण जाणून घेऊया…..

 

कोणत्या जिल्ह्यात येलो अलर्ट?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस मुंबईसह उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. तसेच आजूबाजूच्या काही जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाच्या सरी बरसणार आहेत.

 

कोणत्या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत होईल. या जिल्ह्यांमध्ये विजांसोबत मुसळधार पाऊस होणार असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्रातील बीड, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, आहिल्यानगर आणि नाशिकमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याठिकाणी पुढचे काही दिवस जोरदार पाऊस पडणार आहे.