Maharashtra Weather : पावसाबाबत एक मोठी व महत्वाची बातमी समोर येत आहे. यावर्षी पावसाने लवकर सुरुवात केली. यंदा मे महिन्यातच मान्सून दाखल झाल्याचा दावा हवामान विभागाने केला आहे. तर यंदा राज्यात लवकर सुरुवात झालेला पाऊस अजूनही सुरुच आहे. सध्या परतीच्या पावसाचा कहर सुरुच आहे. अर्धा सप्टेंबर झाला तरी पाऊस राज्यातील अनेक भागात पडत आहे, दरम्यान, आज राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.
25 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट
दरम्यान, आज राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाच्या प्रदेशिक केंद्राने म्हटलं आहे. आज 18 सप्टेंबर, गुरुवारी राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, कोकणासह विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, राज्यातील 25 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाण्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे. याशिवाय रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

यलो अलर्ट कुठे?
दुसरीकडे पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथ्याला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. कोकणात पालघर जिल्ह्यात आज संततधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि सांगलीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, नंदुरबार, नाशिक घाटमाथा, या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यांसह पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.











