YouTube ने आपल्या मोनेटायझेशन धोरणात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल विशेषतः अशा व्हिडिओंसाठी लागू होणार आहे जे थोकात तयार केले जातात किंवा सतत सारखेच दिसतात. YouTube Partner Program (YPP) अंतर्गत आता अशा कंटेंटची गंभीरपणे तपासणी केली जाणार आहे आणि त्याचा परिणाम थेट क्रिएटर्सच्या कमाईवर होऊ शकतो. नवीन धोरण 15 जुलै 2025 पासून लागू होणार आहे.
YouTube ने काय म्हटलं आहे?
Google च्या मालकीच्या या व्हिडिओ प्लॅटफॉर्मने त्यांच्या सपोर्ट पेजवर या बदलाची माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केलं की आता “थोकात तयार होणारा आणि पुनरावृत्ती होणारा कंटेंट” अधिक काटेकोरपणे तपासला जाईल. कंपनीने नेहमीच मौलिक आणि प्रामाणिक कंटेंट निर्माण करण्याची अपेक्षा क्रिएटर्सकडून केली आहे.
YouTube च्या दोन मुख्य अटी
इतरांचा कंटेंट थेट वापरू नका
जर एखादा क्रिएटर दुसऱ्याचा कंटेंट वापरत असेल, तर त्यात इतका बदल असला पाहिजे की तो नवीन आणि वेगळा वाटला पाहिजे. फक्त कॉपी-पेस्ट किंवा थोडेफार एडिट करून अपलोड केलेले व्हिडिओ आता मोनेटायझेशनसाठी अपात्र ठरू शकतात.
रिपिटेड असलेल्या कंटेंटवर लक्ष
अशा व्हिडिओंवर नजर ठेवली जाईल जे केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी बनवले जातात. उदा. क्लिकबेट थंबनेल, खूप कमी मेहनतीत तयार झालेले व्हिडिओ, एकाच टेम्प्लेटवर आधारित पुनरावृत्ती व्हिडिओ इ. अशा व्हिडिओंची मोनेटायझेशनची शक्यता कमी असेल.
AI कंटेंट आणि ऑटोमेटेड व्हिडिओवरही लक्ष
कंपनीने स्पष्ट उल्लेख केलेला नसला तरी, AI च्या सहाय्याने बनवलेले व्हिडिओ, उदा. इतरांच्या व्हिडिओवर AI-जेनरेटेड आवाजात रिऍक्शन देणे, हेही या नवीन धोरणाच्या कक्षेत येऊ शकतात.
मोनेटायझेशनसाठी आवश्यक पात्रता
किमान 1,000 सब्स्क्राइबर
मागील 12 महिन्यांमध्ये 4,000 वैध सार्वजनिक वॉच अवर्स, किंवा
मागील 90 दिवसांमध्ये 1 कोटी वैध Shorts व्ह्यूज
YouTube चा उद्देश काय?
हा निर्णय YouTube च्या त्या मोहिमेचा भाग आहे ज्याद्वारे गुणवत्तापूर्ण, मौलिक आणि मेहनतीने तयार केलेल्या कंटेंटला प्रोत्साहन दिलं जातं आहे. दुसरीकडे, नकली किंवा कमी मेहनतीत बनवलेले व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरून दूर सारले जातील.





