MP Breaking News
Sun, Dec 14, 2025

Salman Khan : मी रडलो तरी लोक हसतात!” रेड सी फिल्म फेस्टिवलमध्ये सलमान खानने उडवली स्वतःच्या अभिनयाची खिल्ली

आजच्या पिढीतून अभिनय हरवत चालला आहे आणि त्यामुळे स्वतःला तो काही फार मोठा अभिनेता मानत नाही. “तुम्ही मला कुठलेही काम करताना पाहू शकता, पण अभिनय करताना नाही. कारण अभिनय माझ्याकडून होतच नाही. जसं वाटतं, तसं मी करतो,” असे स्पष्ट शब्दांत सलमानने सांगितले
Salman Khan  : मी रडलो तरी लोक हसतात!” रेड सी फिल्म फेस्टिवलमध्ये सलमान खानने उडवली स्वतःच्या अभिनयाची खिल्ली

Salman Khan : बॉलिवूडचा दबंग सुपरस्टार सलमान खान सध्या रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. अनेक दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वर्चस्व टिकवून ठेवणाऱ्या सलमानने आपल्या अभिनय, स्टाईल आणि व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर कोट्यवधी चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मात्र या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये त्याने केलेले एक वक्तव्य आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, त्यावर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

आजच्या पिढीतून अभिनय हरवत चाललाय (Salman Khan) 

रेड सी फिल्म फेस्टिवलदरम्यान एका संवाद सत्रात सलमान खानने आपल्या अभिनय कौशल्यांबाबत अगदी मोकळेपणाने आणि थोड्या विनोदी अंदाजात भाष्य केले. तो म्हणाला की, आजच्या पिढीतून अभिनय हरवत चालला आहे आणि त्यामुळे स्वतःला तो काही फार मोठा अभिनेता मानत नाही. “तुम्ही मला कुठलेही काम करताना पाहू शकता, पण अभिनय करताना नाही. कारण अभिनय माझ्याकडून होतच नाही. जसं वाटतं, तसं मी करतो,” असे स्पष्ट शब्दांत सलमानने सांगितले. त्याचे हे विधान ऐकून उपस्थित प्रेक्षक थोडेसे चकित झाले.

संवादादरम्यान होस्टने उपस्थित प्रेक्षकांना सलमानच्या मताशी सहमत आहात का, असा प्रश्न विचारला. त्यावर अनेकांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. प्रेक्षकांच्या या प्रतिक्रियेवर सलमानने पुन्हा एकदा स्वतःचीच खिल्ली उडवत म्हणाला, “कधी कधी मी चित्रपटात रडतो, तेव्हा मला वाटतं की तुम्ही सगळे मला पाहून हसता.” सलमानचा हा साधा, प्रांजळ आणि स्व-मजेशीर अंदाज काही चाहत्यांना भावला, तर काहींनी त्यावर नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या.

सलमान म्हणतो मला सौदी अरेबियाला यायला आवडत

या कार्यक्रमात सलमान खानने सऊदी अरेबियाविषयीही आपुलकीने भाष्य केले. “मला सऊदी अरेबियाला यायला खूप आवडतं. ही जागा मला खूप चांगली वाटते. मी इथे वारंवार येत असतो, त्यामुळे इथे येणं नेहमीच सुखद असतं,” असे त्याने सांगितले. रेड सी फिल्म फेस्टिवलदरम्यान अनेक बॉलिवूड आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांची उपस्थिती होती. याच कार्यक्रमात अभिनेत्री आलिया भट्टही सहभागी झाली होती. सलमानने आलियाचे मनापासून कौतुक करत तिला “अमेझिंग अभिनेत्री” असे संबोधले.

बाकी, सलमान खानच्या वर्क फ्रंटकडे पाहिल्यास, अलीकडेच तो ‘सिकंदर’ या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याने संजय राजकोट ही भूमिका साकारली होती. मात्र, मोठी अपेक्षा असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यश मिळवू शकला नाही. तरीही सलमानच्या चाहत्यांचा उत्साह अजूनही कायम आहे. आगामी काळात सलमान खान ‘राजा शिवाजी’ आणि ‘बॅटल ऑफ गलवान’ या दोन मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी चित्रपटांमध्ये दिसणार आहे. या चित्रपटांमधून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला असून, चाहत्यांना त्याच्या पुढील भूमिकांची उत्सुकता लागून राहिली आहे.