फ्रिजमधील थंड पाणी पिणे टाळा, त्यामुळे होऊ शकतात ‘या’ गंभीर समस्या, जाणून घ्या…

Asavari Khedekar Burumbadkar

उन्हापासून वाचण्यासाठी लोक अनेकदा थंड पाणी पितात, पण तुम्हाला माहिती आहे का की फ्रिजमधील थंड पाणी पिणे शरीराला हानी पोहोचवू शकते? जरी हे पाणी थंडावा देत असले तरी ते शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे. उन्हातून बाहेर पडल्यानंतर, व्यायाम केल्यानंतर किंवा खाल्ल्यानंतर थंड पाणी पिणे शरीरावर वाईट परिणाम करते. जर तुम्हीही उन्हाळ्यात चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने थंड पाण्याचे सेवन करत असाल तर, त्यामुळे तुमच्या आरोग्याला काय नुकसान होते? जाणून घ्या  

पचनशक्ती

थंड पाणी प्याल्याने पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही आणि अपचनासारख्या समस्या येऊ शकतात. पोटात थंड पाण्याचा पचनसंस्थेवर परिणाम होतो. थंड पाणी प्यायल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे पचनात समस्या निर्माण होतात. 

डोकेदुखी

थंड पाण्यामुळे शरीराचे तापमान अचानक कमी होते, ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते, खासकरून मायग्रेनने ग्रस्त असलेल्या लोकांना. 

रक्तवाहिन्या

जास्त थंड पाणी प्यायल्याने हृदयाचे ठोके कमी होऊ शकतात. इतकेच नाही तर यामुळे शरीराचे तापमान असंतुलित होऊ शकते. आपण थंड पाणी पिणे टाळले पाहिजे कारण थंड पाणी रक्तवाहिन्या आकुंचन पावण्यास मदत करते, ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह कमी होऊ शकतो आणि इतर समस्या निर्माण होऊ शकतात.

घसा खवखवणे

थंड पाणी प्यायल्यासअनेकदा घसा खवखवणे, टॉन्सिल्स सुज येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

तज्ज्ञांच्या मते, थंड पाणी प्यायल्याने पचनसंस्थेची गती मंदावते. यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि वजन कमी करण्यातही समस्या निर्माण होऊ शकतात. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

ताज्या बातम्या