Sharad Pawar Phone Call To Ajit Pawar : मागील काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चा जोरदार रंगल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडी झाल्याचेही आपण बघितलं आहे. आता तर थेट शरद पवारांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल या दोन नेत्यांना फोन केल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार या चर्चांना आणखी बळ मिळताना दिसते.
पवारांनी अजितदादाना का फोन केला??Sharad Pawar Phone Call To Ajit Pawar
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, शरद पवार यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेत प्रफुल्ल पटेल यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण दिल्याचे बोलले जात आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे शरद पवार यांनी स्वत:च हे निमंत्रण दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. Sharad Pawar Phone Call To Ajit Pawar

अजित पवार भोजनाला जाण्याची शक्यता
१२ डिसेंबर रोजी शरद पवारांचा वाढदिवस असतो. या वाढदिवसाच्या निमित्ताने शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांना तसेच नेत्यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण दिलेले आहे. यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचेही काही नेते आहेत. अजित पवार गटाचे मोठे नेते प्रफुल्ल पटेल यांना स्वतः शरद पवार यांनी फोन केला. त्यामुळे प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांच्या घरी स्नेहभोजनासाठी जाणार आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.











