Suhana Khan : King मध्ये धडाकेबाज ॲक्शन अवतारात दिसणार सुहाना खान; स्वतः शाहरुख देत आहेत मुलीला स्पेशल ट्रेनिंग

सुहानाने मागील वर्षी जोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. ओटीटीवर रिलीज झालेल्या या चित्रपटात तिने अनेक नवोदित कलाकारांसह काम केले आणि तिच्या स्क्रीन प्रेझेन्सची प्रशंसा करण्यात आली.

Suhana Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आपल्या आगामी ‘किंग’ या चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या प्रचंड उत्सुकतेचा केंद्रबिंदू बनला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात पहिल्यांदाच शाहरुखची मुलगी सुहाना खान त्यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. वडील-मुलगी अशी अनोखी जोडी, अॅक्शनने भरलेला चित्रपट आणि शाहरुखचा दमदार लुक—या तिहेरी आकर्षणामुळे ‘किंग’ सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. अलीकडेच शाहरुखचा अॅक्शन अवतार समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे. यासोबतच सुहाना देखील या चित्रपटात स्टंट आणि उच्चस्तरीय अॅक्शन सिक्वेन्स करताना दिसणार असून, यासाठी स्वतः शाहरुख तिला ट्रेनिंग देत असल्याची माहिती समोर आली आहे.

सुहाना अत्यंत मेहनती – Suhana Khan

ही माहिती प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खान यांनी एका इव्हेंटदरम्यान दिली. दुबईमध्ये झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी शाहरुख आणि त्याच्या मुलांबद्दल बोलताना अनेक गोष्टी उघड केल्या. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये फराह म्हणताना दिसतात की सुहाना अत्यंत मेहनती असून ‘किंग’साठी ती कठोर सराव करत आहे. त्यांनी हसतच सांगितले की, “शाहरुख स्वतः तिला अॅक्शनमध्ये ट्रेन करत आहे.” त्याचबरोबर फराह यांनी शाहरुखचा मुलगा आर्यन खान याचीही स्तुती केली, कारण त्याने नुकतीच एक जबरदस्त वेब सीरिज तयार केली असून इंडस्ट्रीमध्ये त्याच्या दिग्दर्शनाचीही चर्चा आहे.

द आर्चीज’ मधून सुहाना चे पदार्पण

सुहानाने मागील वर्षी जोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. ओटीटीवर रिलीज झालेल्या या चित्रपटात तिने अनेक नवोदित कलाकारांसह काम केले आणि तिच्या स्क्रीन प्रेझेन्सची प्रशंसा करण्यात आली. आता ‘किंग’ हा तिच्या करिअरमधील पहिलाच मोठा आणि भव्य प्रोजेक्ट ठरणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पादुकोण आणि अभिषेक बच्चनही दिसणार असल्याने चित्रपटाचे वजन आणखी वाढले आहे.

शाहरुख आणि सुहाना (Suhana Khan) यांची अॅक्शन केमिस्ट्री, दोघांच्या व्यक्तिमत्त्वातील साम्य आणि पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करण्याचा क्षण—या सगळ्यांमुळे ‘किंग’वर प्रेक्षकांची नजर खिळली आहे. पुढील वर्षी थिएटरमध्ये रिलीज होणाऱ्या या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासूनच तो वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक ठरणार असल्याची चिन्हे आहेत. सुहाना शाहरुखच्या मार्गदर्शनाखाली अॅक्शन शिकत असल्याने तिच्या भूमिकेकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. शाहरुखच्या चाहत्यांसोबतच सुहानाला पडद्यावर पाहण्यासाठी आतुर असलेले प्रेक्षक आता ‘किंग’च्या रिलीजची वाट पाहत आहेत.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News