आहारात समाविष्ट करा ‘हे’ ५ पदार्थ, वेगाने वाढतील केस, बनतील सिल्की आणि चमकदार

Food for hair growth:   आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, वाढते प्रदूषण आणि तणाव यामुळे केस मोठ्या प्रमाणात गळतात. शिवाय निर्जीव आणि रुक्ष होतात. अशा केसांवर उपचार म्हणून लोक अनेक महागड्या ट्रीटमेंट्स घेतात. परंतु त्याचा फायदा केवळ ठराविक वेळेतच होतो. किंवा अनेकांना इतके पैसे खर्च करूनही फायदा मिळत नाही. परंतु या सर्व बाबींमध्ये लोक महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. ही महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आहार होय.

केस चमकदार, मऊ आणि लांबलचक हवे असतील, तर त्यांना बाह्य गोष्टी पुरवण्याऐवजी आतून पोषण देणे गरजेचे आहे. त्यामुळेच तुम्ही काय खाता याचा तुमच्या केसांवरसुद्धा फरक दिसून येतो. असे काही पदार्थ आहेत ज्यांचा आहारात समावेश केल्याने तुम्हाला चमकदार आणि लांबलचक केस मिळण्यास मदत होते. चला पाहूया हे पदार्थ नेमके कोणते आहेत…..

 

ड्रायफुट्स-

ड्रायफ्रूट्ससुद्धा केसांच्या वाढीमध्ये मदत करतात. आपल्या आहारात ड्रायफ्रूट्सचा समावेश केल्यास केस गळणे कमी होईल. आणि केसांची वाढ चांगल्या पद्धतीने होईल.

मासे-
मासे आरोग्यासाठी खूपच पौष्टिक असतात. यामध्ये ओमेगा-३, फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन्स डी सारखे पोषक घटक असतात. मास्यांच्या सेवनाने केस गळणे कमी होते. केस चमकदार बनतात. शिवाय केसांच्या वाढीस फायदा होतो. त्यामुळे आहारात मासे समाविष्ट करणे आवश्यक आहे.

हिरव्या पालेभाज्या-
हिरव्या पालेभाज्यामध्ये शरीराला आवश्यक असणारे अनेक पोषक घटक असतात. त्याचप्रमाणे यामध्ये केसांना लागणारे पोषक तत्वेसुद्धा आढळतात. हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, लोह, कॅल्शिअम, बीटा कॅरोटीन, फॉलेट असे अनेक जीवनसत्वे असतात. त्यामुळे केसांच्या वाढीस मदत मिळते. तसेच केस चमकदार आणि मऊदेखील होतात. यामध्ये पालक, फ्लॉवर यांसारख्या भाज्या जास्त उपयुक्त ठरतात.

फळे-
फळांमध्ये व्हिटॅमिन सी, अँटी ऑक्सीडेंट असे गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी त्यांचा फायदा होतो. केसांना उत्तम पोषण मिळाल्याने केस चमकदार आणि लांब होतात. शिवाय केस गळतीची समस्यासुद्धा दूर होते. त्यामुळे आपल्या आहारात द्राक्षे, संत्री, चेरी, बेरीज, असे व्हिटॅमिन सी युक्त फळे समाविष्ट करा.

 

अंडी-

अंडी ही नैसर्गिक मल्टीव्हिटॅमिन्स म्हणून ओळखली जातात. यामध्ये शरीराला उपयुक्त असणारे अनेक पोषक घटक असतात. यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन असे अनेक घटक असतात. त्यांचा केसांच्या आरोग्यासाठी विशेष फायदा होतो. केस मजबूत होतात, केस गळती थांबते, तसेच केस वाढवण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या आहारात अंडी समाविष्ट करणे फायदेशीर आहे.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News