सध्या धावपळीच्या जगात चांगली झोप घेणं एक आव्हान ठरत आहे. रात्री चांगली झोप लागली नाही तर पुढचा दिवस वाईट जातो. कमी झोप केवळ शारीरिकच नाही तर मानसिक स्वास्थावर नकारात्मक परिणाम करते. चांगली झोप कशी घ्यावी? जर तुम्हीही गुगलवर असे काही प्रश्न विचारत असाल तर तुमचं उत्तर या लेखात आहे. आज आम्ही तुम्हाला असेच काही उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारू शकते.
लगेच झोप येण्यासाठी काय कराल?
कॅफीन – कॅफीन आणि निकोटीनचं अधिक प्रमाणात सेवन तुमच्या झोपेवर परिणाम करू शकतं. त्यामुळे रात्री चांगली झोप हवी असल्यास झोपेपूर्वी कॅफीनचं सेवन करू नये.
फोन लांब ठेवा – झोपण्यापूर्वी मोबाइल आणि लॅपटॉपचा वापर करू नये. या सवयीमुळे तुमचं मन शांत राहील आणि रात्री चांगली झोपही मिळेल.
व्यायाम – झोपण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचा व्यायाम करू नये. वर्कआऊट केल्यामुळे शरीर थकतं आणि थकलेल्या शरीरामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो.
जेवण – रात्री पोटभरून जेवू नये. यामुळे अपचन किंवा अॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते. ज्यामुळे झोपेवर परिणाम होतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी हलकं जेवण घ्यावं.





