Kolhapuri Pandhra Rassa: घरच्या घरी बनवा पांढरा रस्सा, इथे आहे अस्सल कोल्हापुरी रेसिपी

Aiman Jahangir Desai
 Kolhapuri Pandhra Rassa Marathi recipe:  कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा जगभरात प्रसिद्ध आहे. अनेकजण आवर्जून यावर ताव मारतात. खास पांढरा रस्सा पिण्यासाठी अनेकजण होटल्समध्ये जातात. मात्र हा पांढरा रस्सा तुम्ही घरीसुद्धा जसाच्या तसा बनवू शकता. आज आपण कोल्हापुरी पांढऱ्या रस्स्याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया…

पांढऱ्या रस्स्यासाठी साहित्य-

 

-२०० ग्रॅम चिकन स्टॉक
-१०० ग्रॅम नारळाचे घट्ट दुध
-३० ग्रॅम काजु-१५, बदाम-१५
-१-१/२ टेबलस्पुन पांढरेे तीळ
-१-१/२ टेबलस्पुन खसखस पेस्ट
-२-३ मिरच्या
-१ टेबलस्पुन आल लसुण पेस्ट
-१ टीस्पून जीरे
– ४-५लवंगा
– २ तमालपत्र
-८-१० मिरी
-१ स्टारफुल
-१ जावेत्री
-२-३ दालचिनी
-२ हिरव्या वेलची
– १ मसाला वेलची
-१ टेबलस्पुन साजुक तुप
-चविनुसार मीठ

 

पांढरा रस्स्याची रेसिपी-

स्टेप १-
कोल्हापुरी पांढरा रस्सा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका कुकरमध्ये चिकन स्वच्छ धुवून, आललसुण पेस्ट, मीठ, किंचित हळद जास्त पाणी टाकुन कुकरच्या६-७ शिट्टया शिजवुन घ्या.

स्टेप २-
आता शिजलेल्या चिकनचे पाणी गाळून एका भांड्यात ठेवा. ओल्या नारळाचे  तुकडे करून त्यात पाणी मिक्स करून पेस्ट बनवा. एका स्वच्छ पातळ कपडयाने घट्ट नारळाचे दुध काढुन ठेवा.

स्टेप ३-
नंतर काजु, बदाम, पांढरे तीळ, खसखस २-३ तास पाण्यात भिजत ठेवा.  आता बदामाची साल काढा. आणि सगळ्या साहित्याची पाणी मिक्स करून बारीक पेस्ट बनवा.

स्टेप ४-
आता फोडणी देण्यासाठी खडे मसाले काढून घ्या.

स्टेप ५-
आधी तयार केलेल्या चिकन स्टॉकमध्ये नारळाचे दुध व काजु बदाम तीळ खसखशीची बारीक पेस्ट मिक्स करा. एका पातेल्यात तुप गरम झाल्यावर त्यात खडा मसाला टाकुन परता.

स्टेप ६-
आता यामध्ये चिरलेल्या मिरच्या आणि आलेलसुण पेस्ट घालून परता. त्यात वरील मिश्रण मिक्स करून किंचित उकळी काढा. नंतर गॅस बंद करून चविनुसार मीठ घाला. अशाप्रकारे आपला कोल्हापुरी पांढरा रस्सा खायला तयार आहे.

ताज्या बातम्या