उन्हाळ्यात AC-कूलरशिवाय घर थंड राहू शकतं; ‘या’ नैसर्गिक पद्धतींनी तुमचे घर थंड ठेवा..

Asavari Khedekar Burumbadkar

उन्हाळा सुरू होताच, घरं थंड ठेवण्यासाठी कित्येकजण कूलर आणि एसीचा आधार घेत आहेत. कारण उन्हाळ्यात घर थंड ठेवणे खूप महत्वाचे असते. हे आपल्या आरोग्यासाठी देखील महत्त्वाचे आहे, कारण जास्त तापमान आपल्या शरीराला हानी पोहोचवू शकते. अशा परिस्थितीत, घर आणि स्वतःला थंड ठेवणे खूप महत्वाचे आहे. पण तुम्हाला माहित आहे का की एसीशिवायही तुम्ही तुमचे घर थंड ठेवू शकता? 

आज आम्ही तुम्हाला एसीशिवाय तुमचे घर थंड ठेवण्याचे सोपे उपाय सांगत आहोत. आम्ही तुम्हाला असे नैसर्गिक उपाय सांगत आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही या भयानक उन्हाळ्यात तुमचे घर थंड ठेवू शकता.

छतावर पाणी मारा 

छतावर पाणी मारा उन्हाळ्यात संध्याकाळनंतर घराच्या छतावर पाणी टाकले तर छताला थंडावा मिळेल आणि रात्री पंखा चालवला तर गरम हवेऐवजी थंड हवा खोलीत येईल.

खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा

उन्हाळ्याच्या दिवसात, तुम्ही तुमच्या घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा, ज्यामुळे घर थंड राहील. जास्त सूर्यप्रकाश घराला उष्णता देऊ शकतो, म्हणून उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी जास्त सूर्यप्रकाश आत येऊ देऊ नका.

विद्युत उपकरणे

घरात ठेवलेले वॉशिंग मशीन, ओव्हन आणि डिशवॉशर खूप उष्णता निर्माण करतात. विद्युत उपकरणांचा वापर कमी करा विद्युत उपकरणे उष्णता निर्माण करतात. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात त्यांचा वापर केल्याने तुमच्या घराचे तापमान आणखी वाढते.

टेबल फॅन

टेबल फॅन अशा ठिकाणी ठेवा जिथे तुमच्या घरातील संपूर्ण खोली थंड राहील. त्यामुळे हवेचा प्रवाह वाढेल आणि घरात थंडावा निर्माण होईल, ज्यामुळे एसी ची गरज कमी होईल. 

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

ताज्या बातम्या