Pandharpur Tirupati Railway : १३ डिसेंबरपासून पंढरपूर – तिरुपती रेल्वे धावणार; भक्तांचा प्रवास आरामदायी होणार

१३ डिसेंबरपासून हि रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय सल्लागार समितीचे सदस्य संजय निलेगांवकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानला जातो दुसरीकडे तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठीही महाराष्ट्रातून लाखो भाविक तिरुपतीला जात असतात.

Pandharpur Tirupati Railway : मागील अनेक दिवसापासून पंढरपूर ते तिरुपती बालाजी रेल्वेसेवा सुरु करण्याची मागणी भाविकांकडून केली जात होती. अखेर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून पंढरपूर ते तिरुपती दरम्यान नवीन रेल्वे गाडी सुरू करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे. १३ डिसेंबरपासून हि रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय सल्लागार समितीचे सदस्य संजय निलेगांवकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानला जातो दुसरीकडे तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठीही महाराष्ट्रातून लाखो भाविक तिरुपतीला जात असतात. अशावेळी आता एकाच रेल्वेच्या माध्यमातून विठ्ठल आणि बालाजीचे दर्शन भाविकांना शक्य होणार आहे.

कसे असेल वेळापत्रक – Pandharpur Tirupati Railway

दक्षिण मध्य रेल्वे विभागाने गाडी क्रमांक ०७०१२ आणि ०७०१३ क्रमांकाची पंढरपूर–तिरुपती रेल्वेगाडी लातूर व्हाया चालवण्यात येणार आहे. ही एक साप्ताहिक रेल्वेगाडी असेल. 3 डिसेंबर पासून सुरू होणारी हि रेल्वे 28 डिसेंबर पर्यंत चालवली जाईल. तिरुपती – पंढरपूर साप्ताहिक स्पेशल ट्रेन 13 डिसेंबर पासून प्रत्येक शनिवारी सायंकाळी चार वाजून 40 मिनिटांनी तिरुपती रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे आणि ही गाडी लातूर मार्गे 14 डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी पंढरपूर स्थानकात पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासात हि रेल्वेगाडी प्रत्येक रविवारी रात्री आठ वाजता पंढरपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी रात्री साडेदहा वाजता तिरुपती रेल्वे स्थानकावर पोहचेल.

कशी असेल ट्रेनची रचना –

या रेल्वेमध्ये (Pandharpur Tirupati Railway ) एक एसी प्रथमवर्ग, एक एसी फर्स्ट कम-टू-टीअर , दोन एसी-टू-टीअर, ६ एसी थ्री टीअर, ९ स्लीपर क्लास, दोन द्वितीय श्रेणी कम दिव्यांग एसएलआर असे एकूण २३ डबे असतील. प्रवाशांच्या मिळणाऱ्या प्रतिसादावर या गाडीची पुढील रूपरेषा निश्चित केली जाणार आहे. पंढरपूर ते तिरुपती ट्रेनला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर यापुढेही या रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या जातील असं म्हंटल जातंय. त्यामुळे भाविकांसाठी देवदर्शन अतिशय सोप्प आणि आरामदायी होणार आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News