पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा आणि खबरदारीच्या दृष्टीने अनेक उपाययोजना केल्या जात आहेत त्यामध्ये राज्य सरकारने मुंबई पोलिसांमध्ये एक अतिरिक्त सहाव्या सहआयुक्त पदाची निर्मिती करण्याची घोषणा केली होती. गुप्तवार्ता सहआयुक्त म्हणून हे पद ओळखले जाणार आहे. आता गृहमंत्री देवंद्र फडणवीस आणि पदावरील महिला अधिकाऱ्याचे नाव देखील घोषित केले आहे. गृहविभागाने हा मोठा निर्णय जाहीर केला आहे.
आरती सिंग यांच्यावर जबाबदारी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबईच्या पहिल्या गुप्तवार्ता सहआयुक्त पदावर आरती सिंह कर्तव्यदक्ष महिला आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. राज्य सरकारच्या गृहविभागाने याबाबतचे पत्रक जारी केले आहे. यापूर्वी मुंबईत 5 सहपोलीस आयुक्त होते. नवीन सहपोलीस आयुक्त झाल्यामुळे आता त्यांची संख्या 6 झाली आहे. गुप्तवार्ता सहआयुक्त बनवण्यामागचा मुख्य उद्देश दहशतवादावर नजर ठेवणे आणि कोणत्याही समाजघातक कृतींना वेळेत प्रतिबंध करणे हा आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे सुरक्षा तज्ज्ञांनी स्वागत केले आहे.

कोण आहेत आरती सिंग?
आरती सिंग या मुळच्या उत्तरप्रदेशातील मिर्झापूरच्या असून त्या 2006 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. आयपीएस आरती सिंह महाराष्ट्र केडरच्या आयजी (महानिरीक्षक) दर्जाच्या अधिकारी आहेत. सध्या त्या महाराष्ट्रात महानिरीक्षक प्रशासन म्हणून आपली जबाबदारी सांभाळत होत्या. बदलापूरच्या एटीएसची जबाबदारी देखील त्यांनी सांभाळली होती.
ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरमधील एका शाळेत काही महिन्यांपूर्वी दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. अलीकडेच महाराष्ट्रातील बदलापूर जिल्ह्यातील एका शाळेतील दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या प्रमुख आयपीएस अधिकारी आरती सिंहच होत्या. आरती सिंह यांच्या कामाच्या पद्धतीमुळे आणि कार्यक्षमतेमुळे एका कर्तव्यदक्ष महिला आयपीएस अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी एमबीबीएसचं शिक्षण घेऊन काही काळ वैद्यकीय क्षेत्रात काम केल्याची देखील माहिती आहे. आरती सिंग आपला कारभार धडाडीने चालवण्यासाठी ओळखल्या जातात.
गुप्तवार्ता विभागाचे काम काय?
पोलीस गुप्तवार्ता विभागाची मुख्य जबाबदारी म्हणजे समाजातील गुन्हेगारी, अतिरेकी, गुप्त हालचाली आणि कायद्याच्या विरोधातील कारवायांबाबत माहिती गोळा करणे आणि ती संबंधित अधिकाऱ्यांना कळवणे. या विभागाचे अधिकारी गोपनीय पद्धतीने माहिती मिळवतात, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवतात आणि संभाव्य धोके ओळखून सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी उपाययोजना सुचवतात. गुप्तवार्ता विभाग विविध स्त्रोतांद्वारे माहिती गोळा करतो, विश्लेषण करतो आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मदत करतो. हा विभाग राष्ट्राच्या अंतर्गत सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असून कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्याची भूमिका निर्णायक असते. त्यांचे कार्य सतत निरीक्षण, माहिती संकलन आणि अहवाल तयार करण्यावर आधारित असते.