‘स्वागताला दारं उघडी ठेवा! मी येतोय’ म्हणत रितेश देशमुख घेऊन येत आहे बिग बॉस मराठी सिझन ६. नव्या प्रोमोमुळे महाराष्ट्रात एकच चर्चा, एकच विषय घोळतोय तो म्हणजे बिग बॉस मराठी सिझन ६. सगळीकडे उत्साहाची लाट उसळली आहे. रितेशचा हटके लूक, दमदार स्वॅग प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
बिग बॉस 6; प्रोमोची सर्वत्र चर्चा
नव्या प्रोमोमध्ये रितेश भाऊंचा मस्त लूक, आत्मविश्वासाने ओसंडून वाहणारा स्वॅग आणि ठसकेबाज डायलॉग्स प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. “मागचा सिझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय… आहात ना तय्यार!” या वाक्याने चाहत्यांची उत्सुकता अक्षरशः शिगेला पोहोचली आहे. मागील सिझनने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं, आणि यंदा तोच स्वॅग, पण रितेश भाऊंच्या खास पॅटर्नमध्ये पाहायला मिळणार असल्याचं संकेत मिळत आहेत.
View this post on Instagram
बिग बॉस 6 कधी सुरू होणार ?
‘बिग बॉस मराठी ६’ ११ जानेवारी २०२५ पासून रात्री ८:०० वाजता सुरू होणार आहे. कलर्स मराठीने बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनचा प्रोमो शेअर करत, ‘आता सगळे होणार बेभान. रितेश भाऊ घेऊन येत आहेत महाराष्ट्राचं तुफान !!’ असं कॅप्शन लिहिलं आहे. त्यामुळे आता बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये कोण-कोण स्पर्धक सहभागी होणार? याबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
प्रोमोच्या प्रत्येक फ्रेममध्ये त्यांचा आत्मविश्वास, देसी अॅटिट्यूड आणि स्टाईल प्रेक्षकांना खिळवून ठेवते. या प्रोमोमुळे अनेक प्रश्नांना उधाण आलं आहे. यंदाचा पॅटर्न नेमका काय असणार? घरात कोणते चेहरे दिसणार? कोणाचा नवस पूर्ण होणार आणि कुणाच्या सलामीने घराचं वातावरण झिंगणार? “काही असेही असणार… पण मी गप्प नाही बसणार!” या कडक डायलॉगमुळे पुढे काय घडणार याची उत्सुकता अधिकच वाढली आहे.





