Weather Update: महाराष्ट्रात बुधवारी थंडीची लाट येणार? हवामान विभागाकडून मोठी अपडेट समोर

पुढील काही दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढेल, अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे सातत्याने बदलणाऱ्या हवामानाचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. 

महाराष्ट्रातील हवामान बदलामुळे नागरिक सध्या चांगलेच हैराण झाले आहेत. राज्यातील हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत मागील आठवड्यात राज्यातील तापमानात मोठी घट झाली होती. काही ठिकाणी पारा ९ अंशांच्या खाली पोहोचला होता. मागील दोन दिवसांपासून जोर काहीसा कमी झाला असून किमान तापमान १२ ते १३ अंशांच्या आसपास जाणवते. मात्र पुढील काही दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढेल, अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे सातत्याने बदलणाऱ्या हवामानाचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे.

राज्यात थंडीचा जोर वाढणार !

कडाक्याच्या थंडीनंतर राज्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अनेक भागात ढगाळ हवामान आहे. यामुळे कमालीच्या गारठ्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र राज्यातील थंडीचा जोर हळू-हळू पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मागील काही दिवसांत गारठा कमी झाला आहे. आगामी काळात देखील मुंबईतून थंडी कमीच राहणार आहे. 26 नोव्हेंबरला मुंबईत कमाल तापमान 32 तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहील.

पुणे शहर आणि परिसरात निरभ्र आकाश राहील आणि थंडी पुन्हा हळूहळू वाढू लागेल. पुण्यातील कमाल तापमान 31 आणि किमान तापमान 17 अंश सेल्सिअस असेल. कोल्हापूरमध्ये कमाल तापमान 30 तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके राहील. नाशिकमध्ये कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तर आकाश सामान्यतः निरभ्र राहील. जळगावमध्ये थंडी वाढली आहे. इथे किमान तापमान 15 अंश सेल्सिअस पर्यंत खाली येऊ शकते.

मराठवाड्यात देखील पुन्हा एकदा थंडी वाढणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 32 तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहील. नागपूरमध्ये मुख्य निरभ्र आकाश राहील. तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहील. तर अमरावतीत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33 आणि 16 अंश सेल्सिअस असेल. उत्तर भारतातील थंड हवेमुळे राज्यातील किमान तापमानात कमालीची घट झाली होती. परंतु सध्या राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढे आहेत. आगामी काही दिवस हीच स्थिती कायम राहील. मात्र नोव्हेंबर अखेरीस थंडी पुन्हा वाढेल.

डिसेंबर महिन्यात थंडी वाढेल?

आठ दिवसांसाठी थंडीचा जोर कमी होणार असून, नागरिकांना गारठ्यापासून थोडा दिलासा मिळणार आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या मते, सध्या बंगालच्या उपसागरात जे वादळ तयार होत आहे, त्याचा थेट परिणाम स्थानिक हवामानावर दिसून येत आहे. या बदलामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग मंदावला आहे, तर त्याऐवजी बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या उष्ण हवेचा प्रवाह वाढला आहे. याचसोबत हवेतील आर्द्रतेतही वाढ झाली आहे. त्यामुळे, आता नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता असून, थंडीचा कडाका कमी राहील. त्यामुळे डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी पडण्याचा अंदाज आहे.

थंडीचा जोर लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी कमाल तापमानात २.२ अंश सेल्सियसने वाढ तर किमान तापमानात १.७ अंश सेल्सियसने घट झाली आहे. सध्याची ही स्थिती तात्पुरती आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळेल, परंतु डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून थंडीचा जोर पुन्हा वाढेल. वादळी हवामान स्थिर झाल्यानंतर उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह पुन्हा सुरू होतील आणि तेव्हा खऱ्या अर्थाने कडाक्याची थंडी अनुभवायला मिळेल.


About Author

Rohit Shinde

Other Latest News