अलीकडच्या काळात एसटी बसच्या वाढत्या अपघातांमुळे नागरिक आणि प्रवासी वर्गामध्ये गंभीर चिंता निर्माण झाली आहे. दररोज समोर येणाऱ्या दुर्घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चालकांची निष्काळजीपणा, वाहनांची अपुरी देखभाल, रस्त्यांची खराब अवस्था आणि वाढती वाहतूक ही प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
अनेक प्रवासी जीवावर उदार होऊन प्रवास करत आहेत, तर कुटुंबीयांनाही भीतीचा सामना करावा लागतो. प्रवासी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारकडे तातडीने सुरक्षा उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे. नियमित तपासण्या, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि चालकांचे प्रशिक्षण वाढवणे अत्यंत गरजेचे असल्याचे सर्वांनीच नमूद केले आहे. काही ठिकाणी अपघातांमध्ये प्रवाशांना किरकोळ दुखापत होत आहे, तर काही अपघातांमध्ये प्रवाशांना जीव देखील गमावावा लागत आहे.

वसई आगाराच्या बसचा भीषण अपघात
शिरसाड- वज्रेश्वरी या राज्यमार्गाची दुरवस्था झाल्याने अपघाताची मालिका सुरू असून हायवा ट्रक व एसटीबसमध्ये अपघात झाला आहे. वज्रेश्वरी रस्त्यावर मांडवी येथे हायवा ट्रक जात होता. यावेळी मागून येणाऱ्या एस टी बस हायवा ट्रकला ओव्हरटेक करतेवेळी हायवा ट्रक बसला घासल्याने बसचा अपघात झाला. या अपघातात बसचे नुकसान झाले असून पुढेची काच फुटली आहे. अपघात घडल्यानंतर बस चालकाने वेळीच ब्रेक घेत बस थांबवली. यावेळी बसमधील प्रवाशांना धक्का बसला सुदैवाने यापघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
खड्ड्यांमुळे हा अपघात घडला असल्याचे सांगण्यात आले. हा अपघात मांडवी पोलीस ठाणे जवळ घडला आहे घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलिसांनी धाव घेतली. शिरसाड- वज्रेश्वरी रस्त्यावर मोट्या प्रमाणात वाहतूक होत आहे. अवजड वाहनांची वर्दळ रोज असते, अति वेगात जाणारे हायवा ट्रक अपघाताला आमंत्रण देत असतात. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यांमुळे वाहने हळुवारपणे जात असून वारंवार वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये संताप
अलीकडील काळात वाढलेल्या अपघातांच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. दररोजच्या प्रवासात सुरक्षिततेचा अभाव जाणवत असल्याने सामान्य नागरिक अस्वस्थ झाले आहेत. वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी, चालकांचा निष्काळजीपणा, वाहनांच्या नियमित देखभालीतील दुर्लक्ष आणि रस्त्यांची खराब अवस्था यामुळे अपघातांची मालिका वाढत आहे.
अपघातात जीवितहानी होत असल्याने प्रवाशांचे सरकार आणि प्रशासनाकडे लक्ष वेधले जात आहे. सुरक्षित प्रवास हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असल्याने तात्काळ सुधारणा कराव्यात, अशी जोरदार मागणी जोर धरत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सक्षम उपाययोजना राबवण्याची गरज पूर्वीपेक्षा अधिक अधोरेखित झाली आहे.