State government : नोकदार कुटुंबासाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. कामगार व नोकरदार वर्गाला मोठा दिलासादायक बातमी म्हणजे मुलांच्या संगोपनासाठी सुरक्षित व दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहे. केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची काळजी घेता यावी, यासाठी ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीत ‘पाळणा’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मंत्री अदिती तटकरेंनी सांगितलं आहे.
महिन्यात 26 दिवस, दररोज 7.5 तास सुरु
दरम्यान, पाळणा घर महिन्यात 26 दिवस, दररोज 7.5 तास सुरु राहील, यामध्ये जास्तीत जास्त 25 मुले असतील. याठिकाणी एक पाळणा सेविका व एक पाळणा मदतनीस नेमण्यात येईल. वीज, पिण्याचे पाणी, बालस्नेही शौचालयसारख्या सुविधा उपलब्ध असणार आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी सेविका यांना 1500 प्रतिमाह भत्ता देण्यात येणार आहे. अंगणवाडी मदतनीस यांना ₹750 प्रतिमाह, पाळणा सेविका मानधन यांना 5500 प्रतिमाह, तर पाळणा मदतनीस यांना 3000 प्रतिमाह भत्ता देण्यात येणार आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
पाळणाघरांमध्ये डे-केअर व विविध सुविधा
दुसरीकेड मुलांना दिवसातून तीन वेळा म्हणजेच सकाळचा नाश्ता, दुपारचे गरम शिजवलेले जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता असा पोषण आहार देण्यात येईल. तर महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पाळणाघरांमध्ये डे-केअर सुविधा, पूर्व शालेय शिक्षण, पूरक पोषण आहार, वाढीचे निरीक्षण, आरोग्य तपासणी, लसीकरण, सुरक्षा आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. त्यामुळं शासनाच्या या निर्णय़ामुळं जे दोन्ही पालक नोकरी करतात, ज्यांना मुलांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही, अशासाठी हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे, असं बोललं जातं.





