2017 मध्ये मनपात भाजपाचाच महापौर होणार होता, पण उद्धव ठाकरेंनी…, मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे की शिवसेनेचा महापौर व्हावा. उद्धवजी खूप नाराज आहेत, त्यामुळे तुम्ही शिवसेनेला महापौरपद द्या, अशी विनंती त्यांनी केली होती. भाजपानं क्षणाचाही विलंब न करता मोठं मन दाखवलं.

BJP : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरळी येथील डोम मैदानात भाजपाकडून विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तुमच्याकडील संख्याबळानुसार भाजपाचा महापौर बनू शकतो, पण उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे की, शिवसेनेचा महापौर व्हावा. उद्धवजी खूप नाराज आहेत, त्यामुळं तुम्ही शिवसेनेला महापौरपद द्या, अशी विनंती शिवसेनेकडून करण्यात आली होती. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भाजपानं क्षणाचाही विलंब केला नाही

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी 2017 च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा दाखला देत सांगितलं की, भाजपाचा पहिला महापौर बसवण्याची संधी निर्माण झाली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांचा फोन आला. त्यांनी विनंती केली की, तरीही पक्षानं गणित जमवलं आणि भाजपाचा पहिला महापौर बसवण्याची संधी निर्माण झाली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर यांचा फोन आला. त्यांनी विनंती केली की, भाजपानं क्षणाचाही विलंब न करता मोठं मन दाखवले, आणि शिवसेनेचा महापौर व्होवो असा खळबळजनक गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला.

मुंबईत महायुतीचा भगवा झेंडा फडकेल

“2017 मध्ये भाजपानं मोठ्या मनानं शिवसेनेला महापौरपद दिलं होतं, मात्र 2019 मध्ये शिवसेनेनं दगा दिला. पण, यंदा मुंबईत महायुतीचा भगवा झेंडा फडकेल आणि यावेळी महायुतीचा महापौर बसवल्याशिवाय कार्यकर्ते घरी जाणार नाहीत”, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेनं महायुती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केली. याचा उल्लेख करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2019 मध्ये तुम्ही ओरबाडून नेलं. पण आम्ही रडणारे नाही, लढणारे आहोत. आम्ही 2022 मध्ये गनिमी कावा केला आणि 2024 मध्ये पूर्ण बहुमतानं सत्ता मिळवली. असं फडणवीस म्हणाले.


About Author

Astha Sutar

Other Latest News