MP Breaking News
Fri, Dec 12, 2025

Onion Price: कांद्याची आवक वाढल्याने बाजारात दरात घसरण; कांदा उत्पादकांची डोकेदुखी कायम !

Written by:Rohit Shinde
देशभरात कांद्याच्या दरात घसरण ही सध्याची समस्या आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे बाजारात कांद्याची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता. आवक वाढल्यामुळे भाव घसरले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

महाराष्ट्रातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याची आवक चांगलीच वाढताना दिसत आहे. परिणामी दरामध्ये सातत्याने घसरण सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांमध्ये यामुळे चिंतेचे वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. दरामध्ये सुधारणा होण्याची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घट

राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज कांद्याची एकूण आवक 1 लाख 19 हजार 186 क्विंटल इतकी झाल्याची नोंद आहे. त्यातील 29 हजार 883 क्विंटल उन्हाळी कांद्याची सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 484 ते 2270 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच नाशिक मार्केटमध्ये आवक झालेल्या 6386 क्विंटल लाल कांद्यास 483 ते 3838 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. गुरुवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत कांद्याच्या दरात काहीशी घट दिसून येत आहे. तर इतर दरात वाढ झालेली दिसून येत आहे.

देशभरात कांद्याच्या दरात घसरण

देशभरात कांद्याच्या दरात घसरण ही सध्याची समस्या आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे बाजारात कांद्याची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता. आवक वाढल्यामुळे भाव घसरले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. कांद्याच्या या घसरणीमुळे किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांनाही फायदा होतो, कारण कमी किमतीत कांदा मिळतो. मात्र शेतकऱ्यांसाठी ही चिंता वाढवणारी बाब आहे. शेतकऱ्यांनी या परिस्थितीत साठा व्यवस्थापन आणि उत्पादनाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे, तसेच बाजारपेठेतील मागणी-पुरवठ्याचा अभ्यास करून भाव स्थिर ठेवण्याचे उपाय करणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांनी बाजाराचा नियमित अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे त्यांना उत्पादनाची योग्य प्रमाणात वाढ किंवा कपात करण्यास मदत होते, तसेच कोणत्या काळात उत्पादन विकणे फायदेशीर ठरेल हे ठरवता येते. बाजारातील भाव, मागणी-पुरवठा, हंगामानुसार बदल, विविध बाजारपेठांतील दर यांचा अभ्यास केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक तोटा टाळता येतो.