attacked journalists in Trimbakeshwar – नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार किरण ताजणे, योगेश खरे व अभिजीत सोनवणे यांच्यावर गुंडांकडून झालेला अमानुष हल्ला हा अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार आहे. जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडणाऱ्या पत्रकारांना लक्ष्य करून करण्यात आलेली ही मारहाण म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरचा थेट हल्ला आहे, सरकारने या हल्लेखोर गावगुंडांचा तातडीने बंदोबस्त करावा. तसेच हे राज्य गुंडांच्या हाती आहे का? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये पार्किंगमध्ये प्रवासी गाड्यांच्या पावत्या फाडणाऱ्या गुंडांकडून पत्रकारांना झालेल्या मारहाणीची घटना ही अत्यंत संतापजनक आहे. पत्रकारांना मारहाण करण्यापर्यंत या गुंडांची मजल कशी गेली? कुणाच्या पाठबळावर त्यांची मस्ती सुरुय, याची चौकशी झाली पाहिजे आणि…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 20, 2025
हे महाराष्ट्राला लांचानस्पद – राष्ट्रवादी काँग्रेस
दरम्यान, हे राज्य गाव गुंडाकडे गेलेले आहे. कोणालाच कोणाची भीती राहिली नाही .कोणी कोणाची आई बहीण काढत महाराष्ट्र ची संस्कृती फोफावत आहे. हे महाराष्ट्राला लांचानस्पद आहे. पत्रकारांना भ्याड मारहाण निषेध आहे. या व्यवस्थेमध्ये लोकशाहीच निष्पक्ष ठरू लागलेले चारी स्तंभ लोकशाहीच्या हालतान दिसत आहे. राज्य गावगुंड्याच्या हाती गेलेले आहे दुसरं काय होणार. पत्रकारांना जर मारहाण होत असेल तर सर्वसामान्यांचा काय विचार करायचा… पोलिस देखील त्यांनाच टार्गेट करत आहे… अशी टिका आमदार जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.
राज्यात कोणीही सुरक्षित नाही – काँग्रेस
पत्रकारांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती गंभीर झाली असून राज्यात कायद्याचे राज्य आहे की गुंडांचे असा प्रश्न पडला आहे. राज्यात कोणीही सुरक्षित नाही हे आजच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. त्र्यंबकेश्वर येथे गुंडांनी पत्रकारांवर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात पत्रकार गंभीर जखमी झाले असून, किरण ताजणे यांना मोठी दुखापत झाली आहे. ही घटना अभिव्यक्ती स्वातंत्र्य व माध्यमांच्या सुरक्षिततेवर घाला घालणारी आहे. राज्यात पत्रकार संरक्षण कायदा तातडीने लागू करणे ही काळाची गरज असून पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणे ही राज्य सरकार आणि गृहखात्याची जबाबदारी आहे. आम्ही या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो, असं काँग्रेसने म्हटलं आहे.












