MP Breaking News
Mon, Dec 15, 2025

राज्यात 13 जूनपासून मान्सून दाखल होणार, तुमच्या जिल्ह्यात पावसाची काय स्थिती? हवामान विभागाने कुठे दिलाय अलर्ट?

Written by:Astha Sutar
१० ते १३ जूनदरम्यान पावसाचा जोर काहीसा कमी होईल. १२ जूनपर्यंत उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. तसेच मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे
राज्यात 13 जूनपासून मान्सून दाखल होणार, तुमच्या जिल्ह्यात पावसाची काय स्थिती? हवामान विभागाने कुठे दिलाय अलर्ट?

State Rain – पावासाबाबत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. यावर्षी पावसाने वेळेआधी लवकर हजेरी लावली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने राज्यातील अनेक भागात दमदार हजेरी लावली होती. २६ मे रोजी मुंबई, उपनगर, गडचिरोलीमार्गे विदर्भात मान्सून दाखल झाला होता. असा दावा हमानान विभागने केला आहे. पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र आता पावसाने मोठा ब्रेक घेतला आहे. तर राज्यात 13 जूनपासून मान्सून दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

ऑरेन्ज अलर्ट कुठे?

दरम्यान, सध्या पेरणी करण्यासाठी शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. मान्सून खान्देश, नाशिक व विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यांत अद्याप पर्यंत पोहोचू शकला नाही. निम्मा महाराष्ट्र मान्सूनने व्यापला असला तरी अनेक भागात पाऊस पडला नाही आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी पुन्हा १३ जूनपासून पुन्हा महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होऊन मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे ऑरेन्ज अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात पाऊस कुठे बरसणार?

राज्यातील अनेक भागात मे महिन्यात हजेरी लावत १२४ वर्षात प्रथमच १२६.७ मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे हा एक पावसाने रेकॉर्ड केला होता. अनेक वर्ष्यानंतर मे महिन्यातच मान्सून दाखल झाल्याची नोंद झाली आहे. मात्र सध्या पावसाने दडी दिल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. दुसरीकडे शेतकरी पेरणीसाठी मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. पुढील चार दिवसही राज्यात किरकोळ पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी वातावरण अनुकूल आहे. मृग नक्षत्राचा पावसाची शक्यता आहे, असा अंदाज लावला जात आहे. राज्यात मे महिन्यात प्रथमच १२६.७ मिमी पाऊस झाला. १२४ वर्षांतील सर्वांत ओला महिना म्हणून नोंद झाली आहे.